टीम लोकमन मंगळवेढा |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या स्वेरी कॉलेज पंढरपूर येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या संघाने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. औदुंबर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदविला होता. यामध्ये महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने सोलापूर विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक पटकावित 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस दैदीप्यमान कामगिरी करून महाविद्यालयाचा यशाची परंपरा कायम राखली.
हे यश मिळवण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. गणेश जोरवर तसेच प्रा.डॉ. सुधाकर राठोड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाविद्यालयातील या स्पर्धेतील सहभागी खेळाडू तृप्ती शिंदे, अंजली पुजारी, सुकन्या बिराजदार व सलोनी शिंदे यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. औदुंबर जाधव मनोगत व्यक्त करताना म्हणाले, महाविद्यालयाचे खेळाडू गुणी असून सातत्याने प्रयत्न करून त्यांनी हे यश मिळविले आहे. विद्यापीठ पातळीवरील ह्या स्पर्धेमध्ये विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अनेक मोठमोठ्या महाविद्यालयाचे वेगवेगळ्या शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धकांवर मात करून या ग्रामीण भागातील आमच्या विद्यार्थिनींनी यश खेचून आणले आहे. अशाच पद्धतीचे यश त्यांनी राज्य पातळीवर व देश पातळीवरही मिळवावे अशा अपेक्षा व्यक्त करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. पी. एम. होनराव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे समन्वयक प्रा. डॉ. संजय शिवशरण, भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. एस. गायकवाड, प्रा. डॉ. राजेश गावकरे, प्रा. डॉ. राजकुमार पवार, प्रा. सरिता भोसले, प्रा. प्रशांत धनवे, प्रा. डॉ. सुधाकर राठोड, प्रा. डॉ. मायाप्पा खांडेकर, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. गणेश जोरवर यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षण संचालक प्रा. गणेश जोरवर यांनी केले.