टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत (एलिमेंट्री व इंटरमिजिएट) मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते-पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. या इंटरमिजिएट व एलिमेंटरी परीक्षेमध्ये विद्यालयातील एकूण 40 विद्यार्थी बसले होते.
त्यामध्ये ‘ए’ श्रेणीत 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एलिमेंटरी परीक्षेमध्ये जान्हवी रजनीकांत भारते, अर्शला कदीर उस्ताद, साक्षी राजू जाधव, श्रेयस श्रीशैल्य मेडीदार व इंटरमिजिएट परीक्षेत आयुष्यमान लक्ष्मण नागणे, जिया शाकीर सय्यद, कुणाल बाळासाहेब कोळसे, राधिका राजू जाधव, सावरिया सत्यवान गरांडे, संकल्प नामदेव पवार, वृक्षांजली विशाल गेजगे, अपेक्षा भुजंगराव चेळेकर, ‘बी’ श्रेणीत 18 विद्यार्थी, ‘सी’ श्रेणीत 10 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
यंदाचा रेखाकला परीक्षेचा प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशालेतील चित्रकला शिक्षिका रोहिणी आलिगावे व मंगेश केकडे यांचे मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्ष व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे व राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी चित्रकला परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.







