news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

कौतुकास्पद ! आता शिरसीत वाजणार अभ्यासाचा भोंगा, मुलांना मिळणार शिक्षणासोबतच संस्काराचेही धडे ; सरपंच बाबासाहेब कसबे यांचा पुढाकार, शिरसीची आदर्श गावाकडे वाटचाल…

टीम लोकमन by टीम लोकमन
January 3, 2026
in सांगण्याजोगे
0
कौतुकास्पद ! आता शिरसीत वाजणार अभ्यासाचा भोंगा, मुलांना मिळणार शिक्षणासोबतच संस्काराचेही धडे ; सरपंच बाबासाहेब कसबे यांचा पुढाकार, शिरसीची आदर्श गावाकडे वाटचाल…

 

टीम लोकमन मंगळवेढा |

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत आदर्श गावाकडे वाटचाल करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावातील ग्रामस्थांनी एक अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. लोकाभिमुख सरपंच बाबासाहेब कसबे यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम राबविण्यात येणार असून गावात आता अभ्यासाचा भोंगा वाजणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथे 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शिरसी गावचे प्रथम नागरिक सरपंच बाबासाहेब कसबे यांच्या संकल्पनेतून गावातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा शिरसी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गावात हा अनोखा उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत शिरसी गावात अभ्यासाचा भोंगा हा अतिशय अनोखा व महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे ठरले. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वाढता मोबाईल वापर, पालकांचा टीव्ही व मोबाईलचा सातत्याने होणारा अतिवापर, सोशल मीडियामध्ये अहोरात्र गुरफटलेली तरुणाई, सोशल मीडियाच्या जमान्यातील मोबाईलच्या अतिवापरामुळे शाळकरी मुलं शुभंकरोती… ऐवजी एक नंबर तुझी कंबर… या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहेत. घरातील वडीलधाऱ्यांचा आदरयुक्त धाक हळूहळू संपुष्टात येऊ लागला आहे. अभ्यासाची शिस्त आणि संस्कार कमी होत चालले आहेत. म्हणूनच शिरसी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय आणि शिस्त लावण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या उपक्रमाअंतर्गत सायंकाळी 7 ते 9 अशी अभ्यासाची वेळ ठरविण्यात आली. दररोज सायंकाळी 7 वाजता अभ्यासाचा भोंगा वाजणार आहे. भोंगा वाजल्यानंतर गावातील विद्यार्थी अभ्यासाला बसतील. या काळात गावामधील सर्व घरातील टीव्ही, मोबाईल बंद ठेवण्यात येणार आहेत. 2 तास विद्यार्थी अभ्यासाला बसतील तसेच या काळात पालक त्यांच्यावर नियंत्रण ठेवतील. या अनोख्या उपक्रमामुळे दररोज 2 तास गावातील विद्यार्थ्यांचा अभ्यास आता विनाअडथळा होणार आहे.

या विशेष सभेसाठी सरपंच बाबासाहेब कसबे, उपसरपंच शहाजी औताडे, माजी सरपंच बाबासाहेब गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री वेताळ विद्यामंदिर शिरशी येथील शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरसीची आदर्श गावाकडे वाटचाल….
मंगळवेढा शहरापासून दूर, मंगळवेढा व सांगोला तसेच जत तालुक्याच्या हद्दीवर असणारे आणि विकासापासून दुर्लक्षित असणारे हे गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुण तडफदार, उत्साही, कर्तबगार व कर्तव्यनिष्ठ ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव यांनी शिरसी ग्रामपंचायतीचा पदभार घेतल्यापासून गावामध्ये अमुलाग्र बदल झाला असून शिरसी गावचा चेहरामोहरा बदलत चालला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यासाठी शिरसी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून सतत कार्यमग्न असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव तल्लीन होऊन या उपक्रमात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरपंच बाबासाहेब कसबे, उपसरपंच शहाजी औताडे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या साथीने आणि ग्रामस्थांच्या सोबतीने या अभियानात सर्वजण झोकून देऊन काम करत आहेत. याचे फलित म्हणून शिरसी गावचा चेहरा मोहरा बदलणार असून जिल्ह्यातील एक आदर्श गाव म्हणून हे गाव आपली ओळख निर्माण करेल यात शंका नाही.

Previous Post

धक्कादायक ! गृहपाठ न केल्याने विद्यार्थ्यांना अर्ध नग्न करून दिली शिक्षा, व्हायरल फोटोनंतर शिक्षण विभागाने केली कारवाई ; मुख्याध्यापकासह चालक आणि सुरक्षा रक्षकही निलंबित, शाळेला ठोठावला एक लाखांचा दंड

Next Post

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर शाळकरी मुलांचा सामूहिक बलात्कार, निर्जन स्थळी नेलं आणि केले लैंगिक अत्याचार ; व्हिडिओ व्हायरल करण्याचीही दिली धमकी

Next Post
धक्कादायक ! घरासमोर खेळत असलेल्या गतिमंद मुलीला उचलून नेत केला बलात्कार ; शारीरिक संबंधाचे चित्रीकरणही केले, संतापजनक घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर शाळकरी मुलांचा सामूहिक बलात्कार, निर्जन स्थळी नेलं आणि केले लैंगिक अत्याचार ; व्हिडिओ व्हायरल करण्याचीही दिली धमकी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group