news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

जीवन जगत असताना छोटया प्रसंगाने गर्भगळीत न होता मुलांनी जिद्दीने सामोरे जावे : गणेश शिंदे, मंगळवेढ्यात बंसल क्लासेसचे उदघाटन

टीम लोकमन by टीम लोकमन
March 20, 2025
in शैक्षणिक
0
जीवन जगत असताना छोटया प्रसंगाने गर्भगळीत न होता मुलांनी जिद्दीने सामोरे जावे : गणेश शिंदे, मंगळवेढ्यात बंसल क्लासेसचे उदघाटन

टीम लोकमन मंगळवेढा |

जीवन जगत असताना छोटया प्रसंगाने गर्भगळीत न होता मुलांनी जिद्दीने सामोरे जावे असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले ते मंगळवेढ्यात माने गल्ली येथे नव्याने सुरु होत असलेल्या बंसल क्लासेसच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे होते. सुरवातीस बिहार राज्यातील नालंदाचे जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर प्रा. शिवाजीराव काळुंगे, सोमनाथ आवताडे यांच्याहस्ते बंसल क्लासेसच्या इमारतीचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी शिंदे म्हणाले, आज पालकांनी आपल्या मुलांना उत्तम आदर्श दाखविणे आवश्यक आहेत शिक्षणच अशी गोष्ट आहे ते प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करू शकते विद्यार्थ्यांच्या जडण घडणीची पाऊले ओळखण्यासाठी मुलाशी संवाद करता आला पाहिजे आपल्या लेकरांना मोठी स्वप्ने दाखवा बदलत्या परिस्थितीनुसार बदलता आले पाहिजे आपल्या मुलांमधील वेगळे गुण ओळखून त्यामध्येच त्याला संधी देणे गरजेचे आहे. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधीलकी जोपासणे देखील आवश्यक आहे तसेच बंसल क्लासेसच्या माध्यमातून मंगळवेढ्यातून उत्तम अधिकारी बनतील असा आशावाद ठेवून शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्रीकांत खांडेकर म्हणाले, प्रत्येकाचा भविष्यकालीन दृष्टीकोन महत्वाचा आहे माझी गरिबी असताना देखील त्यातून चिकाटीने परिस्थिती बदलता येते हे मी दाखवून दिले आहे. ग्रामीण भागातील मुले ही रानफुलांसारखी असतात त्यांना पाणी मिळाले की ती गुलाबापेक्षाही चांगले बहरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत बंसल क्लासेससाठी आता शहरात जाण्याची आवश्यकता नसून बंसलच आपल्या दारात आले आहे. त्याचा फायदा घेऊन मुलांनी मोठे व्हावे असे सांगितले.

प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, बंसल क्लासेसच्या माध्यमातून मंगळवेढ्यात गुणवत्ता वाढेल नव्या पिढीला घडविण्यासाठी बंसल क्लासेस उपयुक्त ठरतील असे सांगून सर्व बंसल परिवारास शुभेच्छा दिल्या. मंगळवेढ्यातील विद्यार्थ्यांमध्ये नीट, जेईई, एमएचटी-सीईटी यासारख्या स्पर्धात्मक परीक्षेची कौशल्ये विकसीत होण्यास राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बंसल क्लासेसची मदत होणार आहे.

यावेळी सर्व मान्यवरांचे गणेश पवार यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना प्रा. सुधीर कसगावडे यांनी मांडली तर अनुमोदन प्रा. दत्तात्रय माळी यांनी दिले. यावेळी अरुणाताई माळी, निलाताई आटकळे, मुख्याधिकारी चरण कोल्हे, राहुल शहा, प्रकाश गायकवाड, सिद्धेश्वर आवताडे, जयदीप रत्नपारखी, अजित जगताप, चंद्रकांत घुले, चंद्रकांत पडवळे, संजय चेळेकर, गौरीशंकर बुरकूल, प्रा. डी. के. दत्तू, विजय बुरकूल, चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रवीण खवतोडे, धनंजय खवतोडे, सतिश दत्तू, प्रा. विनायक कलुबर्मे, स्वप्निल कसगावडे, अविराज आवताडे, बाळासाहेब थोरवत, प्रा. डी. के. दत्तू, सत्यजित सुरवसे, महादेव माळी, सोमनाथ माळी, उत्तम कसगावडे यांचेसह सामाजिक, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातील मोठया संख्येने मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. संतोष जायभाये यांनी केले तर संतोष मिसाळ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Previous Post

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या व विविध मागण्यासंदर्भात श्री संत दामाजी महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने मंगळवेढा तहसीलदारांना निवेदन ; शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात चर्चा

Next Post

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत अजितदादांची स्पष्ट भूमिका ! राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती

Next Post
‘लाडकी बहीण’ योजनेबाबत अजितदादांची स्पष्ट भूमिका ! राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती

'लाडकी बहीण' योजनेबाबत अजितदादांची स्पष्ट भूमिका ! राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group