news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

पुढील 48 तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान खात्याचा अंदाज, शेतकरी वर्गाच्या अशा पल्लवीत

टीम लोकमन by टीम लोकमन
June 27, 2024
in ताज्या घडामोडी
0
पुढील 48 तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान खात्याचा अंदाज, शेतकरी वर्गाच्या अशा पल्लवीत

टीम लोकमन मंगळवेढा |

राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे. हवामान विभागाकडून पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सून राज्यभरात व्यापला आहे. मात्र गेले काही दिवस पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. आता मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून राज्यातील विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाने दडी मारली असली तरी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पडणाऱ्या सरींमुळे शेतकरी सुखावून जात आहे. पावसातील खंडामुळे राज्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आज (ता. २७) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल. विदर्भ, मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर

Previous Post

चिंता वाढली ! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, झिकाचा रुग्णांना संसर्ग ; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

Next Post

सेवेचे ठाई तत्पर ! मंगळवेढा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शनिवारी मंत्रालयात दुग्धविकास मंत्र्यांसमवेत बैठक ; आमदार समाधान आवताडे यांचा पुढाकार

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group