मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथे दोन ठिकाणी व मंगळवेढा शहरातील नर्मदा पार्क येथे दोन ठिकाणी अशा चार घरफोड्या चोरट्यांनी एका रात्रीत...
Read moreमंगळवेढा: मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील गाव यात्रेच्या निमित्ताने छत्रपती परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मरवडे फेस्टिवल सोहळ्यानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध...
Read moreगेल्या तीन दिवसापासून कार्ला फाट्यावरती उपोषण चाललेला आहे आंतरवाली या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले जरांगे पाटील यांच्या उपोषणाची झळ ही महाराष्ट्रभर...
Read moreमनोज जरंगे पाटील यांना शांततेच्या मार्गाने पाठींबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज देहूच्या वतीने ,मशाल यात्रा व कँडल मार्चचे आयोजन करण्यात...
Read moreतळेगाव दाभाडे येथून बीड कडे जाणारी एसटीबस सेवा सध्या बंद करण्यात आलेली आहे.मनोज जरांगे- पाटील यांनी हाती घेतलेले मराठा आरक्षण...
Read moreजरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मावळ मदब्ये ठिकठिकाणी उपोषण सुरु करण्यात आले आहे. मात्र कार्ला येथील मराठा आंदोलकांनी थेट पाण्यात...
Read moreराज्यातील सत्तासंघर्षानंतर रंगलेल्या आमदार अपात्रतेचे नाट्य जवळपास शेवटच्या टप्यात आहे.येत्या दोन महिन्यात यासंबंधी निर्णय येण्याची शक्यता आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कृतीवर ओढलेले ताशेरे गंभीर आहेत,असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील आमदार अपात्रतेचा निर्णय निश्चित कालावधीत घेण्यासाठी वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.अशात नार्वेकरांनी अपात्रतेसंबंधीचा निर्णय रेंगाळत न ठेवता लवकरात लवकर घ्यावा,अशी मागणी देखील पाटील यांनी केली आहे.२० जुन २०२२ रोजी शिवसेनेत बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षातील बहुसंख्य आमदारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.यानंतर पक्ष आणि निवडणूक चिन्हासंबंधी उद्भवलेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल सुनावला आहे.सर्वोच्च न्यायालयाने देखील आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत घेण्याचे आदेश मे महिन्यात सुनावले होते.पंरतु, तेव्हापासून आतापर्यंत कारवाई संबंधीचे वेळापत्रक निश्चित करण्यात न आल्याने न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णय प्रक्रियेच्या संथगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.सर्वोच्च न्यायालय आणि विधिमंडळातील अधिकारासंबंधी वाद असल्यामुळे निर्णयात विलंब होत आहे.पंरतु,नार्वेकरांनी त्यांच्या पदाची प्रतिष्ठा सांभाळत कायदेमंडळाच्या आदेशाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे,अशी भावना आता जनमानसातून उमटत आहे.पक्षांतर कायद्यानूसार बंडखोरीवर आळाघालण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट आहे. अशात महाराष्ट्रातील प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांकडून दिला जाणारा निर्णय ऐतिहासिक आणि दिशादर्शक ठरू शकतो असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
Read moreबोपोडी : बोपोडी येथे आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ११३ जणांनी रक्तदान केले. गोदाई सोशल फाउंडेशन अध्यक्ष...
Read moreसुरक्षितेच्या दृष्टीने बेकायदेशिर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करणार्यांवर कारवाई आवश्यक : डॉ. हाजी जाकिर शेख पुणे : देशासह राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचे...
Read moreअभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.