टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमाचा प्रारंभ श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे प्रभारी प्राचार्य डॉ.औदुंबर जोती जाधव यांचेहस्ते करण्यात आला.
करिअर कट्टा या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयामध्ये करिअर संसद स्थापन करण्यात आली. या करिअर कट्टा उपक्रमामध्ये विविध अशा 50 पेक्षा जास्त कोर्सेसचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने व नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने हे विविध कोर्सेस विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार आहेत.
महाविद्यालयातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी उत्कर्ष क्षीरसागर, आनंद वरकुटे, दीक्षा डावरे, श्रावणी करमरकर, शिवाजी कांबळे, भीमराव मोरे, गायत्री शेंबडे, ओंकार घाडगे, आकाश जाधव, विशाल रजपूत व करिअर कट्टाचे मंगळवेढा तालुका समन्वयक प्रा. डॉ. जावेद तांबोळी, प्रा. डॉ. सुधाकर राठोड हे उपस्थित होते.











