news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

भाजपचा एकनाथ शिंदे यांना पहिला धक्का ! एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटेंना हटवले, आता रामेश्वर नाईक असतील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख

टीम लोकमन by टीम लोकमन
December 11, 2024
in ताज्या घडामोडी
0
सत्तासंघर्षाचा तिढा वाढला ! गृहखाते तर सोडाच पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ‘या’ चार नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप ; एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

 

टीम लोकमन मंगळवेढा |

राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पहिला मोठा झटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्रमुखपद काढून घेण्यात आले आहे.

मंगेश चिवटे यांना हटवून आता डॉ. रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आले आहे. रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात रामेश्वर नाईक यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचारासाठी मोठी मदत केली होती. यामध्ये मंगेश चिवटे यांची महत्त्वाची भूमिका होती. अगदी सोमवारी रात्री झालेल्या कुर्ला बस अपघातानंतरही मंगेश चिवटे तातडीने कामाला लागल्याचे दिसून आले होते. मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन कुर्ला अपघात प्रकरणातील जखमींची विचारपूस केली होती. या त्यांच्या दमदार कार्यशैलीमुळे मंगेश चिवटे यांनी स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. एकनाथ शिंदे यांचा विश्वासू आणि खास मर्जीतील व्यक्ती म्हणून मंगेश चिवटे यांची ओळख होती.

अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी मंगेश चिवटे यांनी मध्यस्थाची भूमिकाही मोठ्या जबाबदारीने निभावली होती. मंगेश चिवटे हे अनेकदा एकनाथ शिंदे यांचा सांगावा घेऊन मनोज जरांगे पाटलांकडे जात असायचे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेण्यासाठी ज्या वाटाघाटी झाल्या होत्या त्यामध्ये मंगेश चिवटे यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे अल्प कालावधीतच प्रशासनात मंगेश चिवटे हे नाव प्रसिद्ध झाले होते. मात्र आता त्यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्रमुखपद काढून घेण्यात आले आहे. हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा कक्ष म्हणून रुग्णसेवा कक्षाकडे पाहिले जाते. देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात या कक्षाला महत्त्व प्राप्त झाले होते. गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून रुग्णसेवा कक्षाचे काम अत्यंत प्रभावीपणे केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये ओमप्रकाश शेट्ये यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी होती. तर रामेश्वर नाईक यांच्याकडे गेल्या टर्ममध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी होती.

Previous Post

मोठी बातमी ! लग्नकार्यासाठी जाताना काळाचा घाला, प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपची दुचाकीला धडक, आईसह दोन चिमुकल्यांचा अपघातात जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ! ‘त्या’ लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार? 35 लाख महिलांचे अर्ज रद्द, महिलांच्या घरोघरी जाऊन होणार पडताळणी, ‘हे’ कारण आले समोर ; राज्यातील महिलांमध्ये खळबळ

Next Post
लाडकी बहीण योजना ! आता महिलांना मिळणार महिन्याला दीड हजार रुपये? मध्यप्रदेशात गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्र सरकार राबवणार? काय आहेत या योजनेचे निकष?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ! 'त्या' लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार? 35 लाख महिलांचे अर्ज रद्द, महिलांच्या घरोघरी जाऊन होणार पडताळणी, 'हे' कारण आले समोर ; राज्यातील महिलांमध्ये खळबळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group