news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

भाजपचा प्रचार ! यत्नाळकरांनी ‘रामा’ ला दिली ‘प्रभू श्रीरामाची’ मूर्ती

टीम लोकमन by टीम लोकमन
April 10, 2024
in राजकीय
0
भाजपचा प्रचार ! यत्नाळकरांनी ‘रामा’ ला दिली ‘प्रभू श्रीरामाची’ मूर्ती

सोलापूर : सुरज राऊत

जो रामको लायें हैं हम उनको लायेंगे, जय श्रीराम म्हणत नागरिकांनी भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे गावागावात जंगी स्वागत केले. यत्नाळ येथे गावकऱ्यांनी आमदार राम सातपुते यांना प्रभू श्रीरामचंद्रांची आकर्षक मूर्ती भेट देऊन जणू जनमताचा कौलच सांगितला.

लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये बुधवारी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी झंझावाती दौरा सुरू केला आहे. सकाळच्या सत्रात त्यांनी यत्नाळ, होटगी, होटगी स्टेशन, हिपळे, इंगळगी आदी गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. गावागावांमध्ये आमदार राम सातपुते यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात, हलगीच्या कडकडाटात नागरिकांनी जल्लोष केला. आपकी बार चारसो पार, फिर एक बार मोदी सरकार, जय श्रीराम अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते.

आमदार सुभाष देशमुख म्हणाले, विकास न करणाऱ्या काँग्रेसला भाजपवर टीका करण्याचा अधिकार नाही. भाजपने होटगी परिसरात प्रस्तावित लॉजिस्टिक पार्क, म्हैस संशोधन केंद्र, ऊस संशोधन केंद्र, पाच कोटी रुपये खर्चून पर्यटन केंद्र, रस्ते अशा अनेक विषयांवर काम सुरू ठेवले आहे. आसरा चौक ते शिरवळपर्यंत मोठा रस्ता विकसित करण्याचा मानस आहे. एक एक गावातील विकास कामावर आम्ही एक एक तास बोलू शकतो. भविष्यात राम सातपुते एनटीपीसीच्याही भोंगळ कारभारात सुधारणा करतील. भविष्यातील सर्व कामे मार्गी लागणार आहेत. परंतु काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने कोणतेही काम न केल्याचा आरोप केला जातो. मात्र जनता काँग्रेसला त्यांची जागा दाखवेल.

आमदार राम सातपुते म्हणाले, महाराष्ट्रात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने मोठ्या प्रमाणावर जनतेसाठी निधी देण्यात आला. उज्वला गॅस योजना, शौचालय, प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन अशा योजना या काळात राबवण्यात आल्या.

सबका साथ सबका विकास म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व समाज घटकांचा विकास केला आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व सक्षम असल्याचे देशाचे मत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी खंबीरपणे मोदींचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले.

यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभेचे विधानसभा निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, मळसिद्ध मुगळे, यतीन शहा, अण्णाप्पा बाराचारे, महिला मोर्चा अध्यक्षा अंबिका पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष आप्पासाहेब मोटे, भाजपा भटके विमुक्त युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, सरचिटणीस अतुल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Previous Post

मोठी कारवाई ! तीस हजाराच्या लाकडांसह सह टेम्पो जप्त ; वन विभागाची कामगिरी

Next Post

गुगल मिट लाईव्ह योगवर्गाचा तिसरा वर्धापन व जागतिक आरोग्य दिन लोहा येथे उत्साहात साजरा

Next Post
गुगल मिट लाईव्ह योगवर्गाचा तिसरा वर्धापन व जागतिक आरोग्य दिन लोहा येथे उत्साहात साजरा

गुगल मिट लाईव्ह योगवर्गाचा तिसरा वर्धापन व जागतिक आरोग्य दिन लोहा येथे उत्साहात साजरा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group