news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन

टीम लोकमन by टीम लोकमन
June 12, 2025
in ब्रेकिंग न्यूज
0
मोठी बातमी ! अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन

टीम लोकमन |

गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 242 लोक होते. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाल्याची माहिती खासदार परिमल नाथवानी यांनी दिली आहे.

राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी पोस्ट करत लिहिले की, अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. मी त्यांना अनेक वर्षांपासून वैयक्तिकरित्या ओळखत होतो आणि ते खूप चांगले व्यक्ती होते. त्यांच्या अकाली निधनाबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना मी मनापासून संवेदना देतो. भगवान द्वारकाधीश त्यांना शांती देवो. ओम शांती.

उपलब्ध माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते. ज्यामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. ड्रीमलाइनर विमानने टेकऑफ केल्यानंतर ते लगेच कोसळले. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानात दुसऱ्या रांगेत बसले होते. माहितीनुसार माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या पत्नी अंजली रुपानी लंडनमध्ये आहेत आणि रुपाणी त्यांना परत आणण्यासाठी लंडनाला जात होते. या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची माहिती घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांना अहमदाबादला जाऊन विमान अपघातानंतर बाधितांना सर्वतोपरी मदत मिळावी याची खात्री करण्यास सांगितले आहे.

कोण होते विजय रुपाणी

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी म्यानमारमधील येंगेनॉन येथे झाला होता. म्यानमारमधील राजकीय गोंधळामुळे त्यांचे कुटुंब 1960 मध्ये राजकोटमध्ये स्थायिक झाले. विजय रुपानी यांनी गुजरातच्या सौराष्ट्र विद्यापीठातून बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले होते. त्यांनी भाजपच्या महिला शाखेच्या सदस्या अंजली यांच्यासोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगा असून तो अभियंता आहे तर एक मुलगी असून ती विवाहित आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला आहे.

विजय रुपानी अभ्यासादरम्यान भाजपच्या विद्यार्थी संघटनेत एबीव्हीपीमध्ये सामील झाले. 1971 मध्ये ते संघाशी जोडले गेले. भाजपच्या स्थापनेपासून ते पक्षाशी जोडले गेले आहेत. 1976 च्या आणीबाणीच्या काळात ते 11 महिने तुरुंगात होते. 1996 ते 1997 दरम्यान ते राजकोटचे महापौर होते. 1998 मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात युनिटचे सचिव बनवण्यात आले होते. 2006 मध्ये ते गुजरात पर्यटनाचे अध्यक्ष झाले. 2006 ते 2012 दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते.

2013 मध्ये नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ते गुजरात महानगरपालिका वित्त मंडळाचे अध्यक्ष होते. 2014 मध्ये त्यांनी राजकोट पश्चिम येथून आमदारकीची निवडणूक जिंकली. 2014 मध्ये आनंदीबेन पटेल यांच्या सरकारमध्ये त्यांना परिवहन मंत्री बनवण्यात आले होते. 2016 मध्ये ते गुजरात भाजपचे अध्यक्ष झाले. 7 ऑगस्ट 2016 रोजी ते गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री बनले. त्यांनी 2016 ते 2021 दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. ते भारतीय जनता पक्षाचे गुजरात पश्चिम येथून आमदार होते. याशिवाय ते भाजपचे राज्यसभा खासदारही राहिले आहेत.

Previous Post

धक्कादायक ! कॉलेज प्रिन्सिपलच्या जातीय शिवीगाळीमुळे दुःखी झालेल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या ; प्रिन्सिपल विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ व शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी डोणज येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे रास्ता रोको आंदोलन

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group