news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले, अव्वल कारकूनही अडकला जाळ्यात ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, महसूल प्रशासनात खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
May 28, 2025
in क्राईम
0
मोठी बातमी ! कामाची बिले अदा करण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी करणारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांसह 5 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल ; संपूर्ण तालुक्यात खळबळ

टीम लोकमन मंगळवेढा |

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली असून निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

शेतजमिनीच्या वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून 23 लाख रुपये आधीच घेतले होते. त्यानंतर पुन्हा 18 लाखांची मागणी केली होती. त्यापैकी 5 लाख रुपये अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत घेताना पकडण्यात आले आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अगदी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांपासून ते तहसीलदारांपर्यंत अनेकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. अलीकडच्या काळातच परभणी येथे एका महिला क्रीडा अधिकाऱ्यालाही लाच घेताना अटक करण्यात आली होती. आता छत्रपती संभाजीनगरमधील या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झालेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी शेतजमिनीच्या वर्ग बदलासाठी तक्रारदाराकडून मोठ्या रकमेची मागणी केली होती. यापूर्वी 23 लाख रुपये घेतल्यानंतरही त्यांची हाव संपली नव्हती. त्यांनी पुन्हा 18 लाखांची अतिरिक्त मागणी केली. यातील 5 लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना आणि अव्वल कारकून त्रिभुवन यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरु आहे.

Previous Post

मोठी बातमी ! बीडमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा, सहा जणांचा जागीच मृत्यू ; चालक फरार, गेवराई परिसरात तणावाचे वातावरण

Next Post

कोल्हापुरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा ; 30 मे रोजी रुग्णालये व रुग्णसेवक तर 31 मे रोजी आदर्श शिक्षण संस्था सन्मान सोहळा : मंगेश चिवटे

Next Post
सत्तासंघर्षाचा तिढा वाढला ! गृहखाते तर सोडाच पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ‘या’ चार नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप ; एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

कोल्हापुरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा ; 30 मे रोजी रुग्णालये व रुग्णसेवक तर 31 मे रोजी आदर्श शिक्षण संस्था सन्मान सोहळा : मंगेश चिवटे

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

सत्तासंघर्षाचा तिढा वाढला ! गृहखाते तर सोडाच पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ‘या’ चार नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप ; एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

कोल्हापुरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा ; 30 मे रोजी रुग्णालये व रुग्णसेवक तर 31 मे रोजी आदर्श शिक्षण संस्था सन्मान सोहळा : मंगेश चिवटे

May 29, 2025
मोठी बातमी ! कामाची बिले अदा करण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी करणारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांसह 5 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल ; संपूर्ण तालुक्यात खळबळ

मोठी बातमी ! निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले, अव्वल कारकूनही अडकला जाळ्यात ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, महसूल प्रशासनात खळबळ

May 28, 2025
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! बीडमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा, सहा जणांचा जागीच मृत्यू ; चालक फरार, गेवराई परिसरात तणावाचे वातावरण

May 27, 2025
काळाचा घाला ! उजनीतील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडले ; नातेवाईकांचा आक्रोश, एकाचा शोध अद्यापही सुरूच

गुड न्यूज ! सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण प्लसमध्ये ; गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात धरण आले  प्लसमध्ये, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अवघ्या तीनच दिवसात धरणात आले 10 टीएमसी पाणी

May 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक व फेस रीडिंग नुसार वेतन प्रणालीला विरोध ; आमदार समाधान आवताडे यांची भेट घेत दिले मागण्यांचे निवेदन

मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक व फेस रीडिंग नुसार वेतन प्रणालीला विरोध ; आमदार समाधान आवताडे यांची भेट घेत दिले मागण्यांचे निवेदन

May 26, 2025
मोठी बातमी ! पंढरपूर येथे पूजेसाठी गेलेले तीन महाराज नदीपात्रातील मंदिरात अडकले, आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु ; मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group