news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

टीम लोकमन by टीम लोकमन
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

टीम लोकमन वर्धा |

राज्यातील विशेषतः विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे आज रविवारी रात्री निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. केल्या 40 वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास आले आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक कार्यकर्ते घडवले. गरीब परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी आपल्या सौम्य, मृदूभाषेमुळे विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात काँग्रेस पक्षातून केली होती. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी संसदेत वर्धा मतदार लोकसभा मतदार संघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत लोकसभेसह राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. ते 3 वेळा विधान परिषद सदस्य होते. 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमच नव्हे तर सर्वच निवडणुकीतील रणनितीचा देखील भाग राहिले होते. परंतु त्यापूर्वी ते 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोदच्या सरकारमध्ये विदर्भातून मंत्री होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

अनेक वर्षे मंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषवित 1991 मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला होता. यानंतर रामटेक (1996 व वर्धा 1998) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते होते. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालयासह त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.

वर्धा येथील सावंगी मेघे येथे त्यांनी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे मोठे साम्राज्य उभे केले आहे. राजकारणात अनेक व्यक्ती नात्यापलीकडच्या असतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दत्ता मेघे यांच्या बाबतीत दिसते. मृत्युपत्रात कुठेही काही घोळ होऊ नये, कसलीही अडचण येऊ नये याकरिता दत्ता मेघे यांच्या मृत्युपत्रात केंद्रीय नितीन गडकरी यांचे नाव लिहिले असल्याचे गुपित खुद्द दत्ता मेघे यांनीच जाहीररीत्या उघड केले होते. यावरून त्यांच्यातील एक मित्रही पुढे आला होता.

Previous Post

धक्कादायक ! प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला नग्न करून धिंड काढली, नग्नावस्थेत खांबाला बांधून केली बेदम मारहाण ; पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या घटनेने राज्य हादरले, 12 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

March 24, 2026

मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

March 24, 2026
मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group