news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! काँग्रेसचे पुण्यातील बहुचर्चित माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा अखेर काँग्रेसला रामराम ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश

टीम लोकमन by टीम लोकमन
March 10, 2025
in राजकीय
0
मोठी बातमी ! काँग्रेसचे पुण्यातील बहुचर्चित माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा अखेर काँग्रेसला रामराम ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश

टीम लोकमन पुणे |

विधानसभेच्या कसबा पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर अखेर काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर धंगेकर यांनी ठाण्यात जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर धंगेकर काँग्रेस सोडून जाणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी गळ्यात भगवा गमछा घातलेला फोटो आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला होता. यानंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजले जात होते. मात्र माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, मी आता काँग्रेस पक्ष संघटनेत सक्रीय होणार आहे असेही रवींद्र धंगेकर म्हणाले होते. पण आता अखेर रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

पुण्यात एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी ठाण्यात हा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी स्वत: एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर धंगेकर यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिवसेंदिवस काँग्रेसला लागलेली गळती वाढतच चालली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवला होता. त्यांना कसबा पोटनिवडणुकीचे तिकीटही दिले होते. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा मोठा पराभव केला होता. यानंतर काँग्रेसने धंगेकर यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिली. पण त्यांना भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कसब्यातून धंगेकरांना मैदानात उतरविले होते. पण इथंही त्यांचा पराभव झाला. काय म्हणता पुणेकर निवडून येणार धंगेकर ही त्यांची घोषणा लोकसभा आणि विधानसभेत देखील फोल ठरली. पण आता ते काँग्रेसला सोडून जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Previous Post

महिला दिनाला गालबोट ! जागतिक महिला दिनाच्या दिवशीच पोलीस कर्मचाऱ्याने केला महिलेवर बलात्कार ; धक्कादायक घटनेने बीड जिल्हा हादरला

Next Post

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथील विदयुत अभियांत्रिकी विभागाची सानपाडा ट्रॅक्शन सिस्टिम नवी मुंबई व एन्कॉन पुणे या कंपनीस औद्योगिक भेट

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group