news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! EVM विरोधातील आंदोलनाची धग वाढणार, मारकडवाडी गावातून राहुल गांधींचा लॉंग मार्च ; माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे पडलेली EVM विरोधातील ठिणगी देशभर वनवा पेटवणार?

टीम लोकमन by टीम लोकमन
December 6, 2024
in ब्रेकिंग न्यूज
0
मोठी बातमी ! EVM विरोधातील आंदोलनाची धग वाढणार, मारकडवाडी गावातून राहुल गांधींचा लॉंग मार्च ; माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे पडलेली EVM विरोधातील ठिणगी देशभर वनवा पेटवणार?

टीम लोकमन मंगळवेढा |

नुकत्याच राज्यात पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर शंका उपस्थित केली असून ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीतील पक्षांकडून आंदोलनाची रुपरेषा आखली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ईव्हीएम विरोधी आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेत मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशभरात मोठी चर्चा झाली. आता याच गावात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येणार असल्याची माहिती माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी दिली आहे. ईव्हीएम विरोधातील लाँग मार्चची सुरुवातच मारकडवाडी गावातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मारकडवाडी गाव आले होते चर्चेत…

राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. शिवाय देशभरातूनही ईव्हीएम विरोधात संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएम मतांवर अविश्वास दाखवला. निवडणूक निकालात विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांना फारच कमी मते मिळाली असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी लावून धरला. ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची घोषणा केली. मात्र प्रशासनाने ग्रामस्थांना अटकाव करत अभिरुप मतदानाला विरोध केला. ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला त्यानंतर ग्रामस्थांनी मतदानाची प्रक्रिया मागे घेण्याचा निर्णय घेतला. मारकडवाडीतील गावकऱ्यांच्या या अभिनव आंदोलनाची देशपातळीवर मोठी चर्चा झाली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मारकडवाडीत येणार

ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ईव्हीएम विरोधात मोठे आंदोलन उभारण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. आता ईव्हीएम विरोधातील लाँग मार्च मारकडवाडीतून काढण्यात येणार आहे. या लाँग मार्चची सुरुवात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

सोलापुरात महाविकास आघाडीकडून प्रतिकात्मक EVM मशीन फोडून आंदोलन करण्यात आले होते. सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार हे आंदोलन झाले. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती फोडण्याचा तसेच जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारकडवाडीतून लाँग मार्च काढणार आहेत. मारकडवाडी येथे पडलेली ईव्हीएम विरोधातील ठिणगी देशभर वणवा पेटवणार असल्याचे जानकर यांनी म्हटले.

Previous Post

शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.भाई मनोहर धोंडे यांच्या पत्नी वैशालीताई धोंडे यांचे अल्पशा आजाराने निधन

Next Post

मोठी बातमी ! भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन ; भाजपचा झुंजार नेता हरपला

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group