टीम लोकमन पुणे |
पुणे शहरातील खराडी परिसरातील अलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या पतीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती आहे. हाऊस पार्टीच्या नावाखाली पुण्यातील खराडी येथे रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांनी रेव्ह पार्टीवर धाड टाकत सात जणांना ताब्यात घेतले आहे. फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू, हुक्का होता अशी माहिती समोर आली आहे.
पुणे शहरातील उच्चभ्रू खराडी परिसरातील फ्लॅटमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, मद्य व हुक्के जप्त केले आहे. पार्टीमध्ये नशेचे सेवन सुरू होते. पार्टीत सहभागी असलेल्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती व राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे.
खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत अमली पदार्थ, दारू आणि हुक्क्याचे सेवन होत असल्याचे उघड झाले आहे. या पार्टीत 3 महिला आणि 4 पुरुष सहभागी होते. 26 जुलै 2025 रोजी रात्री उशिरा पुणे पोलिसांनी छापा टाकून अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केला आहे.
विशेष बाब म्हणजे या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता. पोलिसांनी प्रांजल खेवलकर आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली असून त्यांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक तपास पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.