टीम लोकमन |
कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पोलीस उपअधीक्षक DYSP वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात डीवायएसपी वैष्णवी पाटील यांचेसोबत प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तिघेजण जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. बेंगलोरवरून कोल्हापूरकडे येत असताना आज पहाटे हा अपघात झाला आहे. वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या ती कार अचानक एका लॉरीला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान या अपघातात झाले असून त्यामध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
DYSP वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर
जखमींना त्वरित चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्यावर तेथे उपचार आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी इनोव्हा कार आणि लॉरीच्या जोरदार धडकेत हा भीषण प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलासह राज्याच्या अँटी करप्शन ब्युरो वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.








