news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! बीडमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा, सहा जणांचा जागीच मृत्यू ; चालक फरार, गेवराई परिसरात तणावाचे वातावरण

टीम लोकमन by टीम लोकमन
May 27, 2025
in क्राईम
0
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

टीम लोकमन गेवराई |

राज्यात 26 मे रोजी पावसाचा धुमाकूळ सुरु असतानाच बीडमध्ये भीषण अपघात झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा बीड जिल्ह्याच्या गेवराई येथे अतिशय भयंकर अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

गेवराई येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ झालेला हा अपघात इतका भयंकर होता की रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला होता आणि जिकडे तिकडे रक्त होतं. या अपघातानंतर गेवराईमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेवराई येथील काही नागरिकांची चारचाकी गाडी तांत्रिक बिघाडामुळे गढी परिसरात बंद पडली होती. या गाडीला आणण्यासाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावर जिकडे तिकडे रक्तच होतं.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताला कारणीभूत ठरलेला कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघाताने गेवराई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

गुड न्यूज ! सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण प्लसमध्ये ; गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात धरण आले  प्लसमध्ये, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अवघ्या तीनच दिवसात धरणात आले 10 टीएमसी पाणी

Next Post

मोठी बातमी ! निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले, अव्वल कारकूनही अडकला जाळ्यात ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, महसूल प्रशासनात खळबळ

Next Post
मोठी बातमी ! कामाची बिले अदा करण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी करणारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांसह 5 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल ; संपूर्ण तालुक्यात खळबळ

मोठी बातमी ! निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले, अव्वल कारकूनही अडकला जाळ्यात ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, महसूल प्रशासनात खळबळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group