news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार रविवारी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत येणार ; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचे होणार लँडिंग, जाणत्या राजाच्या दौऱ्याने आंदोलनाला बळ मिळणार?

टीम लोकमन by टीम लोकमन
December 7, 2024
in ताज्या घडामोडी
0
मोठी बातमी ! माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार रविवारी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत येणार ; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचे होणार लँडिंग, जाणत्या राजाच्या दौऱ्याने आंदोलनाला बळ मिळणार?

टीम लोकमन मंगळवेढा |

ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे परवा रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी मारकडवाडी येथे येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता शरद पवार यांचे हेलिकॉप्टरने मारकडवाडी येथे आगमन होणार आहे.

EVM विरोधातील देशात मारकडवाडी हे पहिले गाव होते. ज्या गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन केले होते. याच ठिकाणी आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच भेट देणार असून रविवारी शरद पवार पहिल्यांदा मारकडवाडी गावात पोहोचणार आहेत.

माळशिरसचे आमदार आणि या आंदोलनाचे नेते उत्तमराव जानकर यांचा विधानसभा सदस्य म्हणून शपथविधी देखील रविवारीच होणार होता. मात्र उत्तमराव जानकर यांनी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेऊन सोमवारी अध्यक्षांच्या दालनात शपथ घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू केल्याने मतदान प्रक्रिया थांबवली

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी राज्यभर चर्चेत आले आहे. कारण या गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. यासाठी आंदोलन देखील केले होते. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू करत ही मतदान प्रक्रिया थांबवली होती. त्यामुळे ग्रामस्थांना बॅलेट पेपरवरील इच्छा मतदान घेता आले नव्हते. या गावाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. मारकडवाडी या ठिकाणी होणारी मतदान प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. तसेच या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले होते. त्यामुळे बॅलेट पेपरवर होणारी मतदानाची प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.

मारकडवाडी ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करुन भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Previous Post

मोठी बातमी ! भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन ; भाजपचा झुंजार नेता हरपला

Next Post

मोठी बातमी ! कार व मळणी यंत्र वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार ; मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपून परतत असताना काळाचा घाला

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group