news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल ; ठाकरेंवर तातडीने करण्यात आली ‘ही’ मोठी शस्त्रक्रिया, ऐन निवडणुकीत ठाकरेंना घ्यावी लागणार विश्रांती

टीम लोकमन by टीम लोकमन
October 14, 2024
in आरोग्य
0
मोठी बातमी ! राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल ; ठाकरेंवर तातडीने करण्यात आली ‘ही’ मोठी शस्त्रक्रिया, ऐन निवडणुकीत ठाकरेंना घ्यावी लागणार विश्रांती

टीम लोकमन मंगळवेढा |

राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी मुंबईतील एच.एन रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी गेले आहेत. सकाळपासून उद्धव ठाकरे रुग्णालयातच आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती.

अलीकडे त्यांना पुन्हा त्रास झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे हे आरोग्य तपासणीसाठी एच.एन रिलायन्स रुग्णालयात गेले होते. ठाकरेंच्या हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये ब्लॉकेज आढळल्याने उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता उद्धव ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. यापूर्वीही 2012 साली उद्धव ठाकरेंवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

अँजिओप्लास्टी म्हणजे काय?

अँजिओप्लास्टी एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्याचा उपयोग करून ह्दयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ब्लॉक झालेल्या धमन्या उघडण्यासाठी केला जातो. अँजिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरी शिवाय हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह पुनर्संचयित करते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत अँजिओप्लास्टी करण्यात येते. अँजियोप्लास्टीला परक्यूटेनियस कोरोनरी इंटरवेंशन (PCI) असेही म्हटले जाते.

अँजिओप्लास्टी करताना एक लांब पातळ ट्यूब (कॅथेटर) रक्त वाहिन्यांमध्ये टाकली जाते आणि ब्लॉक आर्टरीज उघडल्या जातात. कॅथेटरच्या टोकाला एक छोटा फुगा असतो. जेव्हा कॅथेटर एखाद्या ठिकाणी ठेवला जातो तेव्हा धमन्याच्या संकुचित भागात हा फुगा फुगवला जातो. यामुळे धमन्याच्या काठाला असलेले ब्लड क्लॉट दाबले जाते ज्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास मदत होते. अँजिओप्लास्टी केल्यानंतर डॉक्टर कॅथेटर बाहेर काढून टाकतात. ते ठिकाण झाकण्यासाठी एका पट्टीचा वापर केला जातो. यात सर्जिकल प्रक्रियेच्या तुलनेत कमी जोखिम असते.

डॉक्टर अँजिओप्लास्टीची शिफारस कधी करतात?

रुग्णाला छातीत दुखण्यासारखी लक्षणे दिसतात. ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो. अँजिओग्राफीने हृदयाच्या कोरोनरी धमन्या किंवा इतर धमन्यांमधील अडथळा दिसून येतो तेव्हा डॉक्टर अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी 30 मिनिटे ते 3 तासापर्यंतचा वेळ लागतो. काही केसमध्ये अधिक वेळही लागू शकतो. अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाला 1 ते 2 दिवसांत घरी सोडले जाते. साधारण एक आठवडा डॉक्टर त्या रुग्णांना विश्रांतीचा सल्ला देतात. कुठलाही व्यायाम न करण्याची सूचनाही डॉक्टर रुग्णांना करतात.

Previous Post

अजितदादांचा शिलेदार सांगोला विधानसभेच्या मैदानात उतरताच विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील ॲक्शन मोडवर ; ‘सोन्याच्या सांगोल्याची सोनेरी माणसं’ हा मुंबईतील सांगोलकरांचा आज स्नेहबंधन मेळावा, सांगोल्यात विधानसभेला तिरंगी लढत अटळ?

Next Post

धक्कादायक ! वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाचा व्हिडिओ व्हायरल करीत एसटी कंडक्टरने संपवले जीवन, दोन वर्षाच्या चिमुकलीचे छत्र हरपले ; एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ, राज्य परिवहन महामंडळाचे तीन अधिकारी निलंबित

Next Post
कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमने गळफास घेत संपवले आयुष्य ; कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सुरजच्या आत्महत्येने कुस्ती विश्वासह सांगली जिल्ह्यावर शोककळा

धक्कादायक ! वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाचा व्हिडिओ व्हायरल करीत एसटी कंडक्टरने संपवले जीवन, दोन वर्षाच्या चिमुकलीचे छत्र हरपले ; एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ, राज्य परिवहन महामंडळाचे तीन अधिकारी निलंबित

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group