news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! सोलापूर अक्कलकोट मार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू तर जवळपास 15 जण जखमी, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश

टीम लोकमन by टीम लोकमन
June 11, 2025
in ताज्या घडामोडी
0
मोठी बातमी ! सोलापूर अक्कलकोट मार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू तर जवळपास 15 जण जखमी, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश

टीम लोकमन सोलापूर |

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर कर्जाळ गावाजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला असून पुण्याहून अक्कलकोटकडे देवदर्शनासाठी निघालेल्या ट्रॅव्हल्स बसने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दोन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती असून, 30 ते 35 भाविक असलेल्या बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून यात लहान मुलांचा देखील समावेश आहे.

ही ट्रॅव्हल्स बस पुण्याहून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाली होती. बसमध्ये सुमारे 30 ते 35 भाविक प्रवास करत होते. कर्जाळ गावाजवळ महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने आलेल्या बसने मागून जोरदार धडक दिली. या जोराच्या धडकेमुळे बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. काही प्रवासी बसमध्ये अडकले होते. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली होती.

ट्रकला मागून धडक बसल्याने ट्रॅव्हल्सचा समोरच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींमध्ये लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Previous Post

मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनीच शरद पवार गटाला मोठे हादरे ; पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते भाजपच्या वाटेवर, पवारांच्या राष्ट्रवादीला गळती

Next Post

धक्कादायक ! ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदार इंदापुरातून बेपत्ता ; चिठ्ठीमध्ये अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करण्याचा पत्नीचा इशारा, पोलीस दलात खळबळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group