news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! राज ठाकरेंवर तिखट शब्दात केलेली टीका मनसैनिकांना झोंबली ; राष्ट्रवादीच्या आमदाराची गाडी फोडली, अमोल मिटकरी यांच्यावर मनसैनिकांचा हल्ला, राष्ट्रवादी व मनसे संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे

टीम लोकमन by टीम लोकमन
July 30, 2024
in ब्रेकिंग न्यूज
0
मोठी बातमी ! राज ठाकरेंवर तिखट शब्दात केलेली टीका मनसैनिकांना झोंबली ; राष्ट्रवादीच्या आमदाराची गाडी फोडली, अमोल मिटकरी यांच्यावर मनसैनिकांचा हल्ला, राष्ट्रवादी व मनसे संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे

टीम लोकमन मंगळवेढा |

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची माहिती मिळत आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांंच्यावर टीका केल्याने मनसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. अकोल्यात हा प्रकार घडला. राज ठाकरे यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र, मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमोल मिटकरी यांनी मनसेकडून झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना म्हणाले की, अशा हल्लांना आम्ही भिक घालत नाही. महायुतीत असे करुन सत्तेत येऊ शकतो असे वाटत असेल तर तसे होणार नाही. असेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

अमोल मिटकरी म्हणाले की, अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर हा प्रकार घडला. मनसेचे कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर उभे होते. त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण असे मागून हल्ले करुन काही होणार नाही, ते नपूसंक लोक आहेत. अशी गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही. मी याप्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.

नेमका वाद काय आहे?

राज ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांना लक्ष्य केले होते. पुण्यातील मुसळधार पावसाचा विषय निघाला तेव्हा राज ठाकरे यांनी खोचक टिप्पणी केली होती. अजित पवार पुण्यात नसूनही पुण्यातील धरणं भरली, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर तिखट भाषेत टीका केली होती. यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारीबाज असा केला होता.

टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये. हे सुपारी बहाद्दर टोल नाक्याचे आंदोलन असेल, भोंग्याचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आले नाही. राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे. राज ठाकरे या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखा आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते.

Previous Post

महाराष्ट्रात पुन्हा लालपरीची चाके थांबणार, एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत ; 2021 मध्ये झाला होता सलग 54 दिवस संप, काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

Next Post

दिवाणी व फौजदारी न्यायालय मंगळवेढा येथील महालोक अदालत मध्ये 150 प्रकरणे निकाली ; 3 कोटी 29 लाख 29 हजार 769 रुपये रकमेची तडजोड

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group