news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! कर्नाटकच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारचा भीषण अपघात ; लक्ष्मी हेब्बाळकर अपघातात जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

टीम लोकमन by टीम लोकमन
January 14, 2025
in ताज्या घडामोडी
0
मोठी बातमी ! कर्नाटकच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारचा भीषण अपघात ; लक्ष्मी हेब्बाळकर अपघातात जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

टीम लोकमन मंगळवेढा |

कर्नाटक सरकारच्या बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. लक्ष्मी या विधिमंडळ पक्षाची बैठक आटोपून बंगळुरूहून बेळगावला येत असताना आज पहाटे 6 वाजता त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातामुळे त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी फॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

लक्ष्मी हेब्बाळकर या बेंगळुरूहून बेळगावला येत होत्या. त्यावेळी कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टीजवळ रस्त्यावर अचानक त्यांच्या गाडीसमोर कुत्रं आडवं आलं. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कारची झाडाला जोरदार धडक बसली. त्यामुळे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठिला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. लक्ष्मी यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे देखील कारमध्ये होते. सुदैवाने आमदार चन्नराज यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.

अपघातात भावाच्या डोक्याला मार

सुदैवाने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी या अपघातातून बचावले आहेत. मात्र कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीवर दोन ठिकाणी फॅक्चर झाले झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ रवी पाटील यांच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. हेब्बाळकर यांच्या पाठीवर दोन ठिकाणी फॅक्चर झाले असून चेहऱ्यावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळीच्या यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दोघांवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातानंतर युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांनी रुग्णालयात जाऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

कसा झाला अपघात?

लक्ष्मी या टोयोटा इनोव्हातून जात होत्या. त्यावेळी हा अपघात झाला. कारचा संपूर्ण चकनाचूर झाला आहे. अपघातानंतर एमयूव्हीच्या सर्व सहा एअर बॅगा उघडल्या होत्या. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला आहे.

Previous Post

धक्कादायक ! सांगोला तालुक्यातील तरुण इंजिनिअरची शिरवळमध्ये गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण आले समोर

Next Post

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या ! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंना पहिला धक्का ; बीडबाबत दादांनी घेतला मोठा निर्णय

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group