टीम लोकमन मंगळवेढा |
संतोष देशमुख प्रकरणाने बीड धुमसत आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. परळीत अचानक बंदची हाक देण्यात आली आहे. तर काही भागात बसवर दगडफेक देखील करण्यात आली आहे. यामुळे परळी शहरात तणावपूर्ण वातावरण पहायला मिळत आहे.
परळीत वाल्मीक कराड यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. परळीत वाल्मीक कराडच्या समर्थनात निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. परळीत एका महिलने स्वत:ला पेटवण्याचा देखील प्रयत्न केला आहे. वाल्मीक कराड याची 75 वर्षीय आई आणि पत्नी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या प्रकरणावरून सकाळपासून वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.
परळीत काही ठिकाणी वाल्मीक कराडच्या समर्थकांनी आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पोस्टरवर चप्पल मारत रोष व्यक्त केला आहे. काही कराड समर्थकांनी टायर देखील पेटवले आहेत. बीड जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश दिले असतानाही आंदोलन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काही समर्थकांनी टायर पेटवल्यानंतर पोलिसांनी ते टायर विझविले आहेत.
परळीत कौडगाव बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे परळी डेपोतून जाणाऱ्या सर्व गाड्यांच्या फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व बसेस डेपोमध्येच लावण्यात आल्या आहेत. या दगडफेकीमुळे परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.
वाल्मीक कराडवर मोक्का लागताच परळी शहरात जाळपोळ
वाल्मिक कराडला आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज वाल्मीक कराड याला केज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याला मकोका देखील लावण्यात आला आहे. त्याच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी परळीत आक्रमक भूमिका घेतली आहे. कराड याच्या समर्थकांनी टायर जाळत रोष व्यक्त केला आहे.
वाल्मिक कराडसाठी त्याची आईदेखील आता मैदानात उतरली आहे. वाल्मिक कराडच्या आईने परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या केला. मात्र काही वेळानंतर वाल्मिकच्या आईला चक्कर आल्याचेही पाहायला मिळाले. तर वाल्मिक कराडच्या पत्नीनेही अनेक गंभीर आरोप केले आहेत.