टीम लोकमन |
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. एअर इंडियाच्या विमानात 242 प्रवासी होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
जवळील अनेक वाहने जळाली आहेत. जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. टेक ऑफनंतरच हा भीषण अपघात घडला आहे. मात्र आता प्रश्न असा आहे की, हा विमान अपघात नेमका कसा घडला? याबाबत आता माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे विमान टेक-ऑफ दरम्यान भिंतीवर आदळले. त्यानंतर हा अपघात झाला. ते विमान एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर 787 होते. त्यात 300 प्रवाशांची क्षमता होती ते लंडनला जाणार होते. त्यामुळे त्यात भरपूर इंधन होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई विमानतळाजवळ हे विमान कोसळले. अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. आगीतून निघणारा धूर दूरवर दिसत आहे. प्राथमिक तपासात विमान अपघाताचे कारण समोर आले आहे.
विमानाचा मागील भाग भिंतीला आदळला गेला. यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही वृत्तांनुसार विमानाचे इंजिन अचानक बिघडले त्यामुळे हा अपघात झाला. विमानतळावर एअर इंडियाचे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर अहमदाबाद अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.