news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

भारतीय जनता पार्टीचे नेते तम्मनगौडा रविपाटील ठरताहेत महिला भगिनींचे आयडाॅल

टीम लोकमन by टीम लोकमन
August 23, 2024
in ताज्या घडामोडी
0
भारतीय जनता पार्टीचे नेते तम्मनगौडा रविपाटील ठरताहेत महिला भगिनींचे आयडाॅल

जत : पांडुरंग कोळळी

भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील जत तालुक्यातील माता-भगिनींचे आयडॉल ठरत आहेत. रक्षाबंधन कालावधीत निघालेल्या त्यांच्या जनकल्याण संवाद पदयात्रेला महिला भगिनींचे प्रचंड प्रतिसाद व आशीर्वाद लाभले आहेत.

महाराष्ट्रातील भाजप सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी संपूर्ण जत तालुक्यात जनकल्याण संवाद पदयात्रा सुरू केली आहे. विशेषत: लाडकी बहीण योजने संदर्भात महिला भगिनींशी संवाद साधने, त्यांच्या अडीअडचणी सोडवून देणे व लाडकी बहीण योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणे हा जनसंवाद पदयात्रेचा प्रमुख हेतू आहे. लाडकी बहीण योजनेची दहा हजारांहून अधिक महिलांची नोंदणी रवी पाटील यांच्या भाजप वार शरूम मधून मोफत करण्यात आली आहे. हजारो महिलांच्या नोंदणी मधील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र लाडकी बहीण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

तम्मनगौडा रवीपाटील यांचे आजोबा सिद्रामप्पा रवी हे प्रतिवर्षी दिवाळी सणाला पंचक्रोशीतील सर्व माता भगिनींना साडीचोळी आहेर करीत होते. त्यांच्या घराण्याची ही परंपरा रवीपाटील यांनी आता संपूर्ण तालुक्यात राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये राजकारण, निवडणूक असा कोणताही हेतू न ठेवता जत तालुक्यातील एक लाख महिला भगिनींना दरवर्षी रक्षाबंधनाला साडीचोळी आहेर करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.

जनकल्याण संवाद यात्रेच्या माध्यमातून हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जत तालुक्यातील आजपर्यंत विविध पदे भोगलेल्या कोणत्याही नेत्यांनी असा सन्मान केला नव्हता तो तम्मनगौडा रवीपाटील यांच्या माध्यमातून होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे‌‌. लाडक्या भावाच्या स्वागतासाठी हजारो महिला सज्ज झाल्या आहेत.

तम्मनगौडा रवीपाटील हे महिला भगिनींच्या समस्यांसाठी धावून येणारे नेते म्हणून त्यांचा महिला भगिनींकडून मोठ्या प्रमाणात सन्मान होऊ लागला आहे. पदयात्रा ज्या गावातून जात आहे त्या ठिकाणी त्यांचे औक्षण करून राखी बांधून स्वागत केले जात आहे. पदयात्रेच्या पहिल्या टप्प्यात व दुसऱ्या टप्प्यातही हजारो भगिनींनी त्यांना राखी बांधली आहे. माता भगिनींचे एवढे प्रेम मिळालेले ते एकमेव नेते आहेत.

जत तालुक्यातील महिलांकडून गावोगावी उद्योग, व्यवसाय व रोजगार उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. संवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक महिलांनी थेट संवाद यात्रेत ही खंत बोलून दाखवली. शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी महिलांना स्वतंत्रपणे उद्योग निर्मिती करावी अशी मागणी समोर येत आहे.

तम्मनगौडा रवीपाटील यांनी लवकरच खास महिलांसाठी टेक्सटाइल पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाच्यावतीने जत तालुक्यातील महिलांसाठी 200 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याची त्यांची संकल्पना आहे. जनसंवाद पद यात्रेच्या माध्यमातून जागा व परिसराची चाचणी सुरू करण्यात आली आहे.

जिरग्याळ, मिरवाड, डफळापुर बेळुंखी, हिवरे, अंकले, डोरली, कुंभारी या गावातील महिला भगिनी यांनी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने येत्या काही दिवसातच पश्चिम भागात टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे घोषणा रवी पाटील यांनी केली आहे. जत तालुक्यातील महिला भगिनींचा आयडॉल बनलेल्या रवीपाटील यांना आमदार करण्याची शपथ हिवरे येथील महिलांनी पांडुरंगाच्या मंदिरात घेतली आहे. त्यामुळे भविष्यात तम्मनगौडा रविपाटील यांच्यासारखा लोकप्रतिनिधी असावा अशी जनमानसात तीव्र इच्छा निर्माण झाली आहे.

Previous Post

रोहिणी चौधरी यांना सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार ; झिरो एनर्जी शाळेचे दत्तात्रय वारे सरांच्या हस्ते पुरस्कार देऊन केले सन्मानित

Next Post

जत तालुक्यातील माडग्याळ येथे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group