माडग्याळ : नेताजी खरात
कर्नाटकच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या, माजी कॅबिनेट मंत्री व निपाणीच्या विद्यमान आमदार सौ. शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी जत तालुक्याचे युवा नेते डॉ. सार्थक शेखर हिट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. सार्थक हिट्टी व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी कौटुंबिक व राजकीय विषयावर चर्चा करण्यात आली.
डॉ. सार्थक यांनी हिट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची व भागीरथी उद्योग समूहाची माहिती त्यांना दिली. त्याचबरोबर माडग्याळ येथील डॉ. सार्थक हिट्टी यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयासही त्यांनी भेट दिली.
यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टर सार्थक यांनी ग्रामीण भागात अतिशय चांगले अद्यावत व सुसज्ज असे जनसंपर्क कार्यालय उभे केले असून या जनसंपर्क कार्यालयाचे पक्ष वाढीसाठी व मजबुती साठी नक्कीच फायदा होईल. या कार्यालयातून ग्रामीण भागातील गोरगरीब व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
तसेच भागीरथी मोफत वाचनालय व हिट्टी ब्लड स्टोरेज सेंटरला भेट देऊन त्यांनी डॉक्टरांचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले. डॉ. सार्थक हिट्टी यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आमच्याकडून आपणास कायम सहकार्य राहील असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी डॉक्टर शेखर हिट्टी, नेताजी खरात यांचेसह युवा मोर्चाचे सर्व सदस्य व निपाणी मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








