news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

खबरदार ! लिपिकानेच फाईल माझ्याकडे आणली पाहिजे ; माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी उगारला शिस्तीचा बडगा

टीम लोकमन by टीम लोकमन
May 13, 2024
in शैक्षणिक
0
खबरदार ! लिपिकानेच फाईल माझ्याकडे आणली पाहिजे ; माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी उगारला शिस्तीचा बडगा

टीम लोकमन सोलापूर |

सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ लाभलेले शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शिक्षण विभागाला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातील विस्कटलेली घडी बसवण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करीत असून प्रलंबित कामांचा निपटारा करण्यास त्यांनी प्राधान्य दिल्याचे चित्र दिसत आहे.

मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभाग हा संपूर्ण राज्यभरात विविध कारणांमुळे चर्चेचा विषय झाला. बोगस दिलेल्या मान्यतांमुळे चौकशी लागली. त्यातच गेल्या दोन वर्षात या विभागाला किमान चार ते पाच शिक्षणाधिकारी लाभले. यामध्ये अनेकांना अतिरिक्त पदभार देण्यात आला. मारुती फडके हे पूर्ण वेळ शिक्षणाधिकारी म्हणून आले होते परंतु ते दबकत दबकत कामकाज करत असल्याने त्यांचा या ठिकाणी काम करण्यात रस नव्हता हे त्यांच्या कामकाजावरून दिसून आले. काही महिन्यातच त्यांनी झेडपीतून काढता पाय घेतला.

यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाची घडी पुन्हा विस्कटली. अनेक कर्मचारी बदलून गेले आणि आले. त्यामुळे कामकाजात गोंधळ उडत आहे. यातच मागील दोन महिन्यापूर्वी वर्धा येथून शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे सोलापुरात आले. त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाची पद्धत पाहिली असता फारच गोंधळ आणि अनियमितता दिसून आली. त्यामुळे ते सुस्त झालेल्या शिक्षण विभागाला शिस्त लावण्याचा एक चांगला प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यासोबतच शिक्षक संघटनांशी सकारात्मक चर्चा करून कामकाज करताना दिसत आहेत.

यापूर्वी माध्यमिक शिक्षण विभागामध्ये कामकाजाच्या फाईल या थेट संबंधित व्यक्ती हातात देऊन शिक्षणाधिकाऱ्याकडे जाऊन सह्या घेत असायचे. जणू अशीच पद्धत प्रचलित झाली होती. मागील काही दिवसापासून या ठिकाणी काम करणारे लिपिक हे ज्याची फाईल आहे त्याच्याच हातात देऊन शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवतात. हे लक्षात आल्यानंतर जगताप यांनी आता थेट कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. लिपिकाच्या हातातूनच फाईल माझ्याकडे आली पाहिजे अन्यथा….. यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातील लिपिकांनी सुद्धा जगताप साहेबांच्या या कडक व शिस्तप्रिय स्वभावाचा धसका घेतला आहे.

Previous Post

आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा ; डॉ. पुष्पांजली शिंदे

Next Post

लक्ष्मीदहिवडी येथील ध्येय क्रांती वाचनालयास तालुका पशुधन अधिकारी डॉ. सुहास सलगर यांचे कडून खुर्च्या भेट

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group