news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

वाहनाचा वेग कमी ठेवून रस्त्यावरील अपघात टाळा : पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर ; मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयात अनोखा उपक्रम

टीम लोकमन by टीम लोकमन
April 22, 2025
in सामाजिक
0
वाहनाचा वेग कमी ठेवून रस्त्यावरील अपघात टाळा : पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर ; मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयात अनोखा उपक्रम

टीम लोकमन मंगळवेढा |

वाहनाचा वेग कमी ठेवला तरच रस्त्यावरील अपघात टाळता येतील असे मत मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर यांनी व्यक्त केले. ते संत दामाजी महाविद्यालय कनिष्ठ विभागातील मराठी विभागाच्या वतीने इयत्ता 12 वी पाठयपुस्तकातील प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वेगवशता पाठावर आधारित आयोजित केलेल्या वाहतुकीचे नियम व वाहन चालविताना घ्यावायची काळजी या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.

सुरवातीस सामाजिक समता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील बक्षिसे वितरित करण्यात आली यावेळी बनकर म्हणाले आज मद्यप्राशन करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळेच रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी. तसेच हेल्मेटचा व सिटबेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील लाल, पिवळा व हिरवा सिग्नल काय संदेश देतात हे लक्षात घ्यावे तसेच वाहतुकीचे नियम हे अपघात कमी व्हावेत व शिस्त लागावी यासाठी आहेत हे लक्षात घेऊन प्रशासनास आपण सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी पोलीस हेड कॉनस्टेबल संभाजी यादव म्हणाले, वाहनाचा वेग कमी असणे आवश्यक असून गाडीवर मोबाईलचा वापर टाळला पाहिजे तसेच वाहन चालवीण्याचे प्रशिक्षण घेऊनच रस्त्यावरती वाहन चालवावे. आपल्या जवळ चालकाचा परवाना असणे गरजेचे आहे. आज रस्त्यावरील लेनची शिस्त न पाळल्यामूळे अनेक अपघात होत आहेत. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज घेणे आवश्यक आहे यासाठी वाहतुकीचे नियम चालकांनी पाळावेत व रस्त्यावरचे होणारे अपघात टाळावेत.

मोबाईल वरती बोलू नका, कानामध्ये हेडफोन घालू नका, वाहने वेगाने चालवू नये, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. असे संदेशात्मक विचार व्यक्त करत एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक करीत आभार मानले. यावेळी गतीला आवरा जीवाला सावरा, जो चुकला नियमाला तो मुकला जीवनाला, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, वाहतुकीचे नियम पाळा रस्त्यावरचे अपघात टाळा, अती घाई संकटात न्हेई अशा विचारांचा जागर घालण्यात आला.

यावेळी तुम्ही या क्षेत्रात कसे आलात आणि कशी प्रेरणा मिळाली ? वाहतूक नियंत्रक पोलीस बनण्यासाठी तुम्ही प्रशिक्षण घेतले का? दिवसभर रस्त्यावर बाहेर असता अशावेळी आपण आरोग्याची काळजी कशी घेता? लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत याचे कारण काय असावे? लोंकाच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय आवाहन कराल? पोलीस तपसणी करते वेळी लोकांच्या मनात भीती असते म्हणून अपघातग्रस्ताना लोक मदत करीत नाहीत याबद्दल आपले मत काय? अशा विदयार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना यादव यांनी उत्तरे देत मुलाखतीचा समारोप करण्यात आला.

यावेळी श्री संत दामाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड यांचेसह कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक-शिक्षका, बारावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनाजी गवळी यांनी तर प्रा. विनायक कलुबर्मे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Previous Post

ज्येष्ठांचा अनुभव ही संस्कार शिदोरी : सुरेश पवार ; ओझेवाडीचे माजी सरपंच तुकाराम क्षिरसागर यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न

Next Post

सेवापुर्ती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगीचे उपशिक्षक अशोक मलगोंडे यांचा आज मंगळवेढा येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात सेवापूर्ती सत्कार सोहळा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group