टीम लोकमन मंगळवेढा |
डोंगरगाव ता. मंगळवेढा येथील रहिवासी व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे यांच्या मातोश्री आशाबाई सिताराम इंगळे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.
आशाबाई इंगळे या ५० वर्षांच्या होत्या. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांचे पश्चात पती, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डोंगरगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, बँकिंग, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आशाबाई इंगळे यांच्या निधनाने इंगळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने डोंगरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.








