news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मरवडे येथील छत्रपती परिवाराच्या वतीने शैक्षणिक पुरस्कारासाठी आवाहन ; सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शाळा व शिक्षकांचा होणार सन्मान

टीम लोकमन by टीम लोकमन
March 18, 2026
in शैक्षणिक
0
मरवडे येथील छत्रपती परिवाराच्या वतीने शैक्षणिक पुरस्कारासाठी आवाहन ; सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शाळा व शिक्षकांचा होणार सन्मान

टीम लोकमन मंगळवेढा |

सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शाळा व शिक्षकांचा छत्रपती परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही सन्मान करण्यात येणार असून या पुरस्कार योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी केले आहे.

मरवडे येथील छत्रपती परिवार व स्व.आप्पा खंडू भगरे सामाजिक ट्रस्टच्या वतीने 2001 पासून जिल्ह्यातील शाळा व शिक्षकांचा विविध शैक्षणिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांसाठी स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार योजना राबविण्यात येत असून शाळांचे अंतरंग, बाह्यांग, वर्गसजावट, शैक्षणिक गुणवत्ता, सहशालेय उपक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळांची निवड करण्यात येते. शिवाय उत्कृष्ट वृक्ष लागवड व संवर्धन करणाऱ्या शाळांचा ‘वृक्ष मित्र शाळा’ पुरस्कारासाठी निवड केली जाते.

त्याचबरोबर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा दरवर्षी कृतीनिष्ठ शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्य व क्रीडा विषयक कामाची दखल घेऊन हे पुरस्कार निश्चित करण्यात येतात. शैक्षणिक क्षेत्रातील चांगुलपण समाजापुढे आणण्याचे काम या पुरस्कार योजनेच्या रुपाने केले जाते.

या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येणाऱ्या शाळा व शिक्षकांचा गौरव मानपत्र, सन्मानचिन्ह, फेटा, शाल व बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी या पुरस्कार योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा व शिक्षकांनी आपले प्रस्ताव दिनांक 25 मार्च 2026 पर्यंत संस्थेकडे सादर करावेत असे आवाहन प्रा. बाळासाहेब भगरे, रावसाहेब सुर्यवंशी, नवनाथ जाधव, शशिकांत घाडगे, सिद्धेश्वर रोंगे, देविदास चौधरी, प्रवीण गुंड, अरुण सरडे, रावसाहेब जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 7057475610, 9764525281, 9421067107 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

स्त्रीशक्तीचा सन्मान करणाऱ्या सूर्योदय परिवाराचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत : सोनियाताई जयकुमार गोरे, मातृशक्ती आणि दुर्गाशक्ती पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात साजरा

Next Post

मंगळवेढ्यातील बेशिस्त वाहतुकीवर मंगळवेढा पोलिसांचा कारवाईचा बडगा ; शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम : संभाजी यादव

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group