टीम लोकमन मंगळवेढा |
सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित बाळे सोलापूर या महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र हरिभाऊ माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सदर सभेसाठी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदर सभेमध्ये मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, सन 2024-25 चे ताळेबंद, तेरीज व नफा तोटा पत्रके वाचून कायम करणे, संचालक मंडळांनी शिफारस केलेल्या सन 2024-25 च्या नफा वाटणीस मंजुरी देणे, मागील अंदाजपत्रकातील ज्यादा खर्चास मान्यता देणे व सन 2025-26 सालाकरिता संचालक मंडळाने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, 31 मार्च 2025 अखेरच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे, सन 2024-25 च्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे, सन 2025-26 साठी संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे, संस्थेच्या सभासदांच्या सोयीसाठी लोणावळा येथे शाखा सुरु करणे बाबत विचार विनिमय करणे, माननीय अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयांचा विचार करणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
तसेच संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार संस्थेचे मार्गदर्शक तथा प्रमुख पाहुणे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तरी सर्व सभासद बांधवांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे असे आवाहन पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ. विद्या गुरुप्रसाद पाटील व संचालक मंडळाने केले आहे.