टीम लोकमन मंगळवेढा |
विठ्ठल दर्शनाची आस असताना शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचा लौकिक आदर्शवत आहे, तसेच आपल्या कामातच ज्यांनी परमेश्वर पाहिला असे महान व्यक्तिमत्व असलेले सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे यांच्या आशीर्वादरुपी सत्काराने गेल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घकाळात कर्तव्य निष्ठेने सेवा बजावून सेवापूर्तीने सत्कारमूर्ती ठरलेले विठ्ठल दादू खांडेकर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील सेवाभावी कार्य खऱ्या अर्थाने सार्थक ठरल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केले.
आंधळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक विठ्ठल खांडेकर गुरुजी यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभा प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून धनश्री परिवाराचे नेते शिवाजीराव काळुंगे बोलत होते.
खांडेकर गुरुजी यांच्या सेवापुर्ती निमित्त माजी शिक्षणाधिकारी प्रदीप मोरे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज मंगळवेढ्याचे सेवानिवृत्त प्राचार्य श्रीधर भोसले, प्राथमिक शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, राहुल गेजगे, प्रतिभा दळवे-नकाते, केंद्रप्रमुख शाम सरगर आदींनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, माजी गटशिक्षणाधिकारी हनुमंत कोष्टी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, नुकतेच सेवानिवृत्त झालेले गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे, शिक्षक नेते मल्लिकार्जुन माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव नागणे, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस हैदर केंगार, होलार समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर भंडगे, ज्येष्ठ नेते नाथा ऐवळे, मुंढेवाडीचे सरपंच अरुण जावळे, सांगली शिक्षक बँकेचे संचालक श्रीमंत पाटील, चंद्रकांत बुगडे, ज्ञानोबा मेटकरी, प्राथमिक शिक्षक समितीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष विठ्ठल ताटे, राजेंद्र लिगाडे, विलास नकाते, भैरू गोडसे, सिद्धेश्वर सावत, विलास ठेंगील, नागनाथ कोकरे, सुनील कोळेकर, सुषमा सुतार, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी केंगार, विलासराव मासाळ, आंधळगाव केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख विष्णू चव्हाण, आंधळगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












