news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

….आणि डॉक्टर व्हायचं राहूनच गेलं ! भरधाव वेगातील डंपरने सोनियाला दुचाकीसह फरपटत नेलं, मृतदेह पाहून सगळेच हळहळले, भीषण अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा दुर्दैवी अंत

टीम लोकमन by टीम लोकमन
January 14, 2025
in क्राईम
0
….आणि डॉक्टर व्हायचं राहूनच गेलं ! भरधाव वेगातील डंपरने सोनियाला दुचाकीसह फरपटत नेलं, मृतदेह पाहून सगळेच हळहळले, भीषण अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा दुर्दैवी अंत

टीम लोकमन मंगळवेढा |

सातारा जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली आणि काही अंतर दूर फरफटत नेले. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या तरुणीच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका येथे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. सोनिया अविनाश कांबळे (वय 22) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. सोनिया कांबळे ही तरुणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयातून ती दुचाकी (क्रमांक MH 50 K 0810) वरून कराड येथे घरी जात होती. पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका इथे आली असता डंपर (क्रमांक MH17 BY 7041) ने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, धडक देऊनही डंपर थांबला नाही. डंपरने दुचाकीसह सोनियाला फरपटत नेले. या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांसह वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच अपघात विभागाचे हवालदार धीरज चतुर आणि महाले अपघात स्थळी दाखल झाले.

तोपर्यंत नागरिकांनी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सोनियाला गंभीर जखमी अवस्थेत नजीकच असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलिसांत डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘स्कूल कनेक्ट 2.0’ उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे संपन्न

Next Post

मोठी बातमी ! वाल्मीक कराडला मकोका लागताच परळीत वातावरण तापले ; अचानक परळी बंदची हाक, बसवर दगडफेक, परळी शहरात तणावपूर्ण वातावरण

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group