टीम लोकमन नाशिक |
नाभिक समाजाचे जेष्ठ नेते व राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुभाष मामा बिडवई यांचे चिरंजीव आनंद सुभाष बिडवई यांचे रविवार दिनांक 7 जुलै रोजी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज सोमवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 9 वाजता लक्ष्मी छाया, पंचवटी येथून निघणार आहे. व पंचवटी स्मशानभूमी नाशिक येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष समाजभूषण भगवानराव बिडवे उर्फ अण्णासाहेब यांनी दुःख व्यक्त केले आहे.







