news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

संपूर्ण देशातील तमाम नाभिक समाजाच्या सामाजिक न्याय हक्कासाठी लढणारा प्रेरणादायी लढवय्या नेता : समाजभूषण भगवानराव उर्फ अण्णासाहेब बिडवे

टीम लोकमन by टीम लोकमन
August 8, 2024
in सांगण्याजोगे
0
संपूर्ण देशातील तमाम नाभिक समाजाच्या सामाजिक न्याय हक्कासाठी लढणारा प्रेरणादायी लढवय्या नेता : समाजभूषण भगवानराव उर्फ अण्णासाहेब बिडवे

 

अण्णासाहेब बिडवे हे नाव महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या संघर्षाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाने अनेक ऐतिहासिक कार्य केले. अण्णासाहेब बिडवे हे नाभिक समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उन्नतीसाठी सतत कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या जीवनातील प्रमुख घटनांचे आणि कार्यांचे विश्लेषण करीत आहे. 8 ऑगस्ट 2024 रोजी अण्णासाहेब बिडवे हे वयाच्या 63 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अण्णासाहेबांच्या जीवनकार्यातील एक अंश या लेखाद्वारे समाजाला अर्पण करीत आहे.


महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नेते व राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब बिडवे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे रौप्य महोत्सवी राज्यव्यापी महा अधिवेशन 50 ते 60 हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाले होते. अधिवेशनानंतर नाभिक समाजाच्या मागण्याबाबत शासन दरबारी सचिव पातळीवर मंत्रालयात प्रथमच बैठकीचे आयोजन होऊन समाजाच्या सर्व मागण्याबाबत खाते निहाय कामकाज चालले.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष असताना 30 मे 2011 रोजी नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी अण्णासाहेब बिडवे यांच्या नेतृत्वाखाली आजाद मैदान मुंबई येथे न भूतो आणि भविष्यती असा लाखो समाज बांधवांचा महामोर्चा काढण्यात आला होता. अण्णासाहेब बिडवे हे नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी अद्याप पर्यंत सतत संघर्ष करीत आलेले आहेत, समाजाच्या प्रश्नाची जाण असलेला नेता, कृतिशील नेतृत्व, अभ्यासू वृत्ती व कुशल संघटक असा ठसा त्यांनी कार्यकर्तुत्वाने समाजमनावर उमटविला आहे. संख्येने अल्प असलेला नाभिक समाज सातत्याने सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेला तसेच राजकीय दृष्टा पुरेसे प्रतिनिधित्व नसलेल्या नाभिक समाजाचे सामाजिक प्रश्न शासन दरबारी प्रदर्शित करून सोडविण्यासाठी उपोषणे, धरणे, मोर्चे, मेळावे यासारखे अनेक आंदोलने, उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करून राज्यस्तरावर नाभिक समाजात सामाजिक न्यायहक्कासाठी समाजजागृती केली. समाजमनाला लढण्याचे सामर्थ्य दिले.

महामंडळाचे महाराष्ट्रात सलग संघटन उभारून आंदोलनाची भूमिका घेत अण्णांनी एक नवा संघर्षाचा मार्ग दाखविला. सामाजिक, राजकीय वर्तुळात नाभिक समाजाची दखल घेतली जाईल,, अशी स्थिती निर्माण करण्यात अण्णा यशस्वी ठरले. असंघटित व विखुरलेला नाभिक समाज संघटित करण्यासाठी स्वर्गीय शंकररावजी जगताप यांनी समाजाला राजकीय अनुभवातून मार्गदर्शन केले, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.हनुमंतराव साळुंखे यांनी प्रबोधनातून जागृती करत समाजाला दिशा दिली, तर स्व. ना. भू. संगमवार यांनी राज्यभर हजारो किलोमीटरचा प्रवास करून प्रत्यक्ष जनसंपर्कातून संघटनकार्य उभारले, याबरोबरच स्व. शशिकांत चव्हाण यांनी नाभिक समाज व समाजाच्या थोर व्यक्ती यांच्या जीवनावर प्रेरणादायक पुस्तकरूपाने निर्मिलेल्या साहित्यातून समाजाला प्रेरणा दिली. आणि वामनराव देसाई यांनी कार्यालयीन कामकाज सांभाळून अनेक वर्ष नाभिक वार्ता या अंकाचे लेखन आणि प्रकाशन कार्यात पुढाकार घेतला.


समाजातील या नेतृत्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अण्णासाहेब बिडवे यांनी सामाजिक न्यायासाठी संघर्षाची आंदोलनात्मक भूमिका घेऊन 30 मे 2011 च्या आजाद मैदानावरील लाखोंच्या मोर्चाने नाभिक समाजाच्या संघटितशक्ती शासनकर्ते व राज्यकर्त्यांना दाखवून दिली. नाभिक समाजासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यात अग्रेसर राहून, ओबीसी समाजाला संघटित करण्यासाठी ओबीसींचे नेते माननीय श्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय समता परिषदेतही राज्यस्तरावर कार्यरत राहिलेले आहेत.

समाज संघटित करीत असतानाच अण्णासाहेबांचा महाराष्ट्रराज्यासह देश पातळीवर अनेक राज्यात जनसंपर्क वाढला, देशातील अनेक सामाजिक संघटनांवर नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली, नेतृत्व, कर्तुत्व आणि वकृत्वामुळे अण्णासाहेब एकाच वेळी अनेक स्तरावर कार्यरत असल्याने कार्यानुभव आणि जनसंपर्कच त्यांना पुढे राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्यास उपयोगी ठरला. अण्णासाहेबांचे संघटन कौशल्य, अभ्यासुवृत्ती, सामाजिक कार्याची तळमळ, माणसं जोडण्याची कला, हाती घेतलेले कार्य यशस्वी होईपर्यंत कष्ट करण्याची मानसिकता अशा सर्वकष नेतृत्वगुणांमुळेच अण्णा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीयस्तरावर समाजमनावर राज्य करू शकले, आज त्यामुळेच देशातील सर्वच राज्यात समविचारी कार्यकर्ते व नेत्यांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे.


त्यात भर म्हणून भारतरत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या आचार, विचारातून प्रेरणा घेऊन जननायक करपुरी कर्पूरी ठाकूर ओबीसी संघटन राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री रघुवीर जी श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले असून या राष्ट्रीय ओबीसी संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची धुरा अण्णा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांनी समाजातील मागास व अति मागास वर्गाच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. इतर मागासवर्गीय समाजाला सामाजिक न्याय मिळावा यासाठी मंडल आयोगाच्या निर्मितीपूर्वी दहा वर्ष अगोदर बिहार राज्यात ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वप्रथम आरक्षण लागू केले होते. त्या काळात त्यांना उच्च वर्णीयांचा अर्थातच सवर्णांच्या प्रखर विरोधाचा सामना करावा लागला होता. समाजातील सामान्य तथा अतिसामान्य घटकांना न्याय दिल्यामुळेच त्यांना जनतेतून जननायक ही सन्मानजनक उपाधी मिळाली होती. त्यांच्याच प्रेरणेतून जननायक कर्पुरी ठाकूर ओबीसी संघटना ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत झालेली आहे.

तळागाळातील पिचलेला अनेक वर्ष न्यायासाठी, हक्कासाठी आसुसलेल्या असंघटित समाजाला संघटित करण्यासाठी, समाजातील सर्व घटकांना संघटित करून संघर्ष करण्याची भूमिका घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष श्री रघुवीरजी श्रीवास यांच्यासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. अण्णासाहेब बिडवे यांनी कार्यारंभ केला आहे. 8 ऑगस्ट 2024 रोजी अण्णासाहेब बिडवे हे वयाच्या 63 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास 40 वर्ष सातत्याने समाजाला संघटित करीत समाजाच्या उत्कर्षासाठी, कार्यरत राहिलेले आहेत. त्यांनी समाजकार्यासाठी समर्पित भावनेने कार्य केले आहे. अण्णांनी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, समाजाची उन्नती झाली पाहिजे, हा ध्यास घेऊन त्यांनी आजपर्यंत कार्य केले आहे.

नाभिक समाजाने गत पन्नास वर्षाहून अधिक काळा पासून सर्वांगाने उभारलेला सामाजिक संघर्षाचा लढा पुकारलेला आहे. या लढ्यात आजतागायत महाराष्ट्रातील अनेक नेते व कार्यकर्त्यांचे योगदान आहे. या सर्वांचे विस्मरण होऊन न देता मिळेल ती माहिती संकलित करून अण्णा साहेबांनी केलेले कार्य, आणि प्रत्यक्ष अनुभवातून “संघर्ष नाभिक समाजाचा” या पुस्तकाची निर्मिती होत आहे. या पुस्तकातून गतकाळात समाजाच्या हितासाठी लढलेल्या नेते व कार्यकर्त्यांची समाजाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांनी केलेला त्याग यासह सामाजिक घटनांचा आढावा घेत, अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नामांकित प्रकाशन संस्था व लेखकाकडून पुस्तक रुपी नाभिक समाजाचा इतिहास साकारण्यात येत आहे. समज्यातील भावी पिढीला निश्चितच गतकाळातील संघर्ष, लढ्यातील प्रेरणादायी प्रसंग व अनुभव मार्गदर्शक ठरतील.


अण्णासाहेब बिडवे यांच्या अविस्मरणीय कार्याला मानाचा मुजरा आणि त्यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा…!
प्राध्यापक सुभाष लिंगायत, श्रीरामपूर

Previous Post

मानाचे पान ! सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वजनदार नेते उत्तमराव जानकर यांना पवारांनी दिली मोठी जबाबदारी ; उत्तमरावांचे शरद पवार गटातील महत्त्व वाढले?

Next Post

रियल हिरो ! ‘त्या’ दोघांसाठी मरवडे येथील श्रीकांत मेलगे बनले देवदूत ; मेलगे यांच्या प्रसंगावधानामुळे मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन अपघातग्रस्त युवकांचे वाचले प्राण

Next Post
रियल हिरो ! ‘त्या’ दोघांसाठी मरवडे येथील श्रीकांत मेलगे बनले देवदूत ; मेलगे यांच्या प्रसंगावधानामुळे मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन अपघातग्रस्त युवकांचे वाचले प्राण

रियल हिरो ! 'त्या' दोघांसाठी मरवडे येथील श्रीकांत मेलगे बनले देवदूत ; मेलगे यांच्या प्रसंगावधानामुळे मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन अपघातग्रस्त युवकांचे वाचले प्राण

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group