news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

अभ्यासाबरोबरच स्वतःच्या कलागुणांचा आविष्कार करण्यासाठी स्नेहसंमेलन हे प्रभावी माध्यम, इंग्लिश स्कूल प्रशालेचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद : स्थानकप्रमुख शरद वाघमारे

टीम लोकमन by टीम लोकमन
December 25, 2025
in शैक्षणिक
0
अभ्यासाबरोबरच स्वतःच्या कलागुणांचा आविष्कार करण्यासाठी स्नेहसंमेलन हे प्रभावी माध्यम, इंग्लिश स्कूल प्रशालेचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद : स्थानकप्रमुख शरद वाघमारे

टीम लोकमन मंगळवेढा |

आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांना दैनंदिन अभ्यासाबरोबरच स्वतःच्या कलागुणांचा आविष्कार करण्यासाठी स्नेहसंमेलन हे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच इंग्लिश स्कूल प्रशालेचे शैक्षणिक कार्य हे कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मंगळवेढा बसस्थानकाचे स्थानक प्रमुख शरद वाघमारे यांनी केले.

शरद वाघमारे हे शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे अमृत महोत्सव वर्ष व संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन निमित्ताने बुधवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या विविध कला गुणदर्शनाचे उद्घाटन करताना बोलत होते. तत्पूर्वी प्रमुख पाहुणे शरद वाघमारे, मंगळवेढा नगरपरिषदेच्या नूतन नगरसेविका प्रीती सूर्यवंशी, अभियंते तेजस सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मंगळवेढा आगाराचे वाहतूक नियंत्रक गणेश गवळी, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, अकॅडमीक ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. मिनाक्षी कदम, सचिव डॉ. प्रियदर्शनी महाडिक, सहसचिव श्रीधर भोसले, संचालिका प्रा. तेजस्विनी कदम, अजिता भोसले, ॲड. शिवाजी पाटील, यतीराज वाकळे, रामचंद्र नेहरवे, दलितमित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य रवींद्र काशीद, शिवतेज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जे.आय.जमदाडे, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक सुहास माने, लता ओमणे, अशपाक काझी, माध्यमिकचे कार्याध्यक्ष दयानंद धसाडे, जुनिअर कॉलेजचे कार्याध्यक्ष व्ही. व्ही. दुधाळ, शिवतेज प्राथमिक शाळेच्या कार्याध्यक्ष एफ. एन. मुटेकर, दलितमित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष डॉ. ए. ए. तुपकर, माध्यमिकचे शिक्षकेतर कार्याध्यक्ष व्ही. आर. नेहरवे, विज्ञान महाविद्यालयाचे शिक्षकेतर कार्याध्यक्ष ए. ए. जाधव इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत दलितमित्र स्व.कदम गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

संस्थेच्या सचिवा डॉ. प्रियदर्शनी महाडीक आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमची संस्था नेहमी प्रयत्नशील असते. त्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी विविध कला गुणदर्शनामध्ये एकापेक्षा एक असे एकूण 44 कला प्रकार सादर करण्यात आले. यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यात देशभक्तीपर गीत, गोंधळी गीत, पारंपारिक लावणी, गणेश आराधना, समूहगीत, कोळी गीत, शेतकरी गीत, कॉकटेल असे दर्जेदार कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. यामधील ऑपरेशन सिंदूर, साउथ इंडियन थीम, आई गोंधळाला ये, गवळण, आम्ही शेतकरी, सेव्ह गर्ल्स, राधाकृष्ण, पंजाबी थीम, भीम गीत, माझा आहार माझी जबाबदारी, गोवा थीम, साक्षरता गीत अशा अनेक कला प्रकारांना प्रेक्षकांचा वन्समोअरचा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती दिवसे व ज्योती पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

नूतन नगरसेविका प्रीती सूर्यवंशी यांचेहस्ते लोगोचे अनावरण
शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आकर्षक अशा अमृत महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण मंगळवेढा नगर परिषदेच्या नूतन नगरसेविका प्रीती सूर्यवंशी व इंजिनिअर तेजस सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तर महाराष्ट्राचे मार्ग परिवहन महामंडळाच्या मंगळवेढा बसस्थानकाचे स्थानकप्रमुख शरद वाघमारे यांचेहस्ते रंगमंचाचे पूजन करण्यात आले. आजच्या माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या विविध कला गुणदर्शनामध्ये नाविन्यपूर्ण व आकर्षक वेशभूषेने सजलेले एकूण 44 कलाप्रकार सादर करण्यात आले.

Previous Post

सांगण्याजोगे ! है अंधेरा फिर भी रोशनी की तू बात कर… लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर ; बेघर मनोरुग्ण आजीला दिला वारी परिवाराने हक्काचा निवारा

Next Post

सोलापुरात शनिवारी एसीएस हॉस्पिटलच्या वतीने हृदयरोग जनजागृती प्रदर्शन व थेट प्रात्यक्षिकाचे आयोजन ; यतीन शहा, मनीष केत, नीलकंठ वाकचौरे यांची प्रमुख उपस्थिती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group