टीम लोकमन मंगळवेढा |
अखिल भारतीय होलार समाज संघटना समाजाच्या न्याय हक्कासाठी अखंडितपणे कार्यरत आहे. समाजाच्या लागलेल्या चुकीच्या जातीच्या नोंदी दुरुस्त व्हाव्यात, होलार समाज अभ्यास आयोग निर्माण व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी अनेक आंदोलने, मेळावे आयोजित केले. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री यांचे उंबरटे झिजवून पाठपुरावाही केला. तरीही समाजाच्या पदरी नैराश्यच आले. या पुढील काळात समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी तरुणाईने समोर यावे, समाजाच्या एकजुटीचा आवाज मंत्रालयात घुमावा. यासाठी नव्या उमेदीने व जोमाने समाज संघटनेच्या चळवळीला टोकाची धार मिळावी यासाठी समाज संघटनेची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय नेते एकनाथ जावीर व प्रदेशाध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या विठुरायाच्या पंढरपूर नगरीत जुन्या एसटी स्टँड समोर असणाऱ्या पंढरपूर इन या हॉलमध्ये रविवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 11 वाजता समाज संघटनेच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे. तरी सर्वानी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन समाज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस हैदर केंगार यांनी केले आहे.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत गुळीग, राष्ट्रीय सरचिटणीस हैदर केंगार, राष्ट्रीय उपाध्यक्ष पांडुरंग ऐवळे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर भंडगे, प्रदेश सांस्कृतिक विभाग प्रमुख रणजीत ऐवळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील ढोबळे, माळशिरस तालुकाध्यक्ष दिनेशे जावीर, आटपाडी तालुकाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष शिवाजीराव केंगार, प्रा. ज्ञानदेव गुळीग, किसन ढोबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाजीराव केंगार, संरक्षण प्रमुख बापूदादा ढोबळे, बारामतीचे मनोज केंगार, माजी तालुकाध्यक्ष बापूराव ऐवळे, तालुका सचिव विकास केंगार, सरचिटणीस राजू भंडगे, जिल्हा सदस्य हनुमंत बिरलिंगे, यांचेसह समय संघटनेचे विविध पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.










