news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

बोराळे पंचायत समिती गणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून युवक नेते अक्षय पवार यांच्या मातोश्री अलका पवार यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

टीम लोकमन by टीम लोकमन
January 22, 2026
in राजकीय
0
बोराळे पंचायत समिती गणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून युवक नेते अक्षय पवार यांच्या मातोश्री अलका पवार यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

टीम लोकमन बोराळे |

मंगळवेढा तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या बोराळे पंचायत समिती गणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अक्षय पवार यांच्या मातोश्री अलका पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून या गटात मतदार संख्या जास्त असल्याने बोराळे गावात नवनवीन राजकीय समीकरणे जुळून येताना दिसत आहेत.

वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणारे एकत्र वावरताना दिसत आहेत तर प्रत्येक निवडणुकीत विरोधकाची भुमीका बजावणाऱ्या वक्तीला उमेदवारी मिळणे. अशा अनेक अनपेक्षित घटना बोराळे गावच्या राजकारणात घडत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूचे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे. दरम्यान आमदार समाधान आवताडे यांचे बोराळे येथील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अक्षय पवार यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करून आपल्या मातोश्री यांची उमेदवारी दाखल केल्याने कुरघोडीच्या राजकारणात अक्षय पवार यांच्या मातोश्री अलका पवार यांना अधिकची पंसती मिळत असल्याचे दिसत आहे. अक्षय पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान त्यांच्या मातोश्रीसाठी जमेची बाजू ठरणार आहे.

शिवसेनेच्या उमेदवार अलका पवार यांचेसमोर उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी यांच्या कन्या ॲड. सुमय्या तांबोळी यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यामुळे या पंचायत समिती गणातील निवडणुक चुरशीची होणार आहे.

Previous Post

जल जीवन मिशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ‘जल सेवा आंकलन’ उपक्रमाची होणार प्रभावी अंमलबजावणी ; ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेचेही होणार मूल्यांकन

Next Post

आज भालेवाडी येथे संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यांचे ‘महिला व बालकांचे आरोग्य : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर व्याख्यान

Next Post
आज भालेवाडी येथे संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यांचे ‘महिला व बालकांचे आरोग्य : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर व्याख्यान

आज भालेवाडी येथे संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यांचे 'महिला व बालकांचे आरोग्य : आव्हाने आणि उपाय' या विषयावर व्याख्यान

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group