news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

कसा निवडून येतोय ते बघतोच, अजित पवार यांनी दिले होते आव्हान ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विजयाच्या दिशेने

टीम लोकमन by टीम लोकमन
June 4, 2024
in ब्रेकिंग न्यूज
0
कसा निवडून येतोय ते बघतोच, अजित पवार यांनी दिले होते आव्हान ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विजयाच्या दिशेने

टीम लोकमन मंगळवेढा |

शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. सातव्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांना तब्बल 53949 मतांची आघाडी मिळाली आहे.

हा अजित पवार यांच्या आढळराव पाटील यांना मोठा झटका मानला जातोय. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. हे माझ्या एकट्याचं यश नाही, सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे असे अमोल कोल्हे म्हणाले.

लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कसा निवडून येतो ते बघतोच, असा सज्जड दम अजित पवारांनी दिला होता. अमोल कोल्हे यांनी हे आव्हान स्विकारले होते. आता लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि आजित पवार गट असे दोन गट पडले. त्यात शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदारकीसाठी संधी देण्यात आली. मात्र, अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिंदेंच्या शिवसेनेतून आयात करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना निवडून कसा येतो हे बघतोच असे चॅलेंज दिले होते. अमोल कोल्हेंनी देखील अजित पवार यांना जशाच तसं उत्तर देत हे चॅलेंज स्विकारले होते.

मोठी आघाडी मिळाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना हा माझा विजय नाही, हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली. अमोल कोल्हे म्हणाले की, अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्यानं आव्हान दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व शिलेदारांनी ज्या हिरहिरीने किल्ला लढवला, त्या प्रत्येकाचा हा विजय आहे. त्याचं कौतुक आहे. पराभव कुणाचा यापेक्षा निष्ठा, प्रमाणिकपणा आणि स्वाभिमान यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचाच हा विजय आहे.

शरद पवार यांच्याबद्दल आदर वाढला

स्वत: लोकसभा निवडणूक लढवत असताना सहा सहा मतदारसंघात जाऊन सभा करणं, थोडं रिस्की असल्याचं अनेक नेत्यानं सांगितलं होतं. पण माझा प्रमाणिक हेतू होता. कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार यांनी संघर्ष उभा करत होते. त्यामध्ये माझा खारीचा वाटा व्हावा म्हणून मदत करत होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची कामगिरी पाहून उर अभिमानाने भरुन येतोय. शरद पवार यांच्याविषयी आदर आणखी वाढलाय. सगळं काही गमावलं असं वाटत असताना शरद पवार ज्या हिमतीने उभे राहिले, हे संघर्षाचं मोठं उदाहरण आहे. हे सर्व महाराष्ट्राला प्रेरणा देणारं आहे, असेही अमोल कोल्हे म्हणाले.

Previous Post

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माडग्याळ येथील वेदिका खरात हिचे उज्वल यश

Next Post

कोल्हापुरात राजेच ! कोल्हापूरात मान आणि मत सुद्धा गादीलाच ; काँग्रेसच्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची विजयाकडे वाटचाल…

Next Post
कोल्हापुरात राजेच ! कोल्हापूरात मान आणि मत सुद्धा गादीलाच ; काँग्रेसच्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची विजयाकडे वाटचाल…

कोल्हापुरात राजेच ! कोल्हापूरात मान आणि मत सुद्धा गादीलाच ; काँग्रेसच्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची विजयाकडे वाटचाल...

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group