news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

अजितदादांचा काँग्रेसला मोठा धक्का ! विद्यमान काँग्रेस आमदार हाती घड्याळ बांधणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी खेळी, राज्यातील महाविकास आघाडीला टेन्शन

टीम लोकमन by टीम लोकमन
September 26, 2024
in राजकीय
0
अजितदादांचा काँग्रेसला मोठा धक्का ! विद्यमान काँग्रेस आमदार हाती घड्याळ बांधणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी खेळी, राज्यातील महाविकास आघाडीला टेन्शन

टीम लोकमन मंगळवेढा |

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. आमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. अजित पवारांच्या बॅनरमुळे शहरात एकच चर्चा रंगली आहे. सुलभा खोडके अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? याबाबत अमरावतीच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज याआधीच व्यक्त करण्यात येत होता. आता शहरातील बॅनरमुळे काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके या अजितदादांच्या यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता अधिकच वाढली असून त्याला दुजोरा मिळत आहे.

आमदार सुलभा खोडके यांच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील अनेक विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर संपूर्ण शहरात झळकले आहेत.

सुलभा खोडके अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार?

अमरावती येथील काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. सुलभा खोडके या काँग्रेसच्या विद्यमान आमदार असल्या तरीसुद्धा राज्यातील काँग्रेसचा कोणताही मोठा नेता या कार्यक्रमासाठी येणार नसल्याचे समजते. त्यामुळे सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा अमरावतीमध्ये जोर धरत आहे.

सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव आहेत. त्यामुळे सुलभा खोडके यांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. सुलभा खोडके आगामी विधानसभा निवडणुक अमरावती मतदारसंघातून लढवणार आहेत.

कसा आहे आमदार सुलभा खोडके यांचा राजकीय प्रवास

सुलभा खोडके यापूर्वी एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या आधीपासूनच अजित पवारांच्या संपर्कात आहेत. मागील निवडणुकीआघी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदारकी मिळवली होती. 2009 मध्ये आमदार रवी राणा यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरत विजय मिळवला आहे.

Previous Post

धक्कादायक ! भर बाजारात पतीने अंगावर पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले, घटनेत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू ; हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला, फरार पतीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Next Post

मोठी बातमी ! अचानक प्रकृती बिघडल्याने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल ; विशेष विमानाने पुण्यातून मुंबईला हलवले

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group