news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

वीस वर्षानंतर सवंगडी एकत्र आले आणि रंगला स्नेहमेळावा ; उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते यांचीही उपस्थिती

टीम लोकमन by टीम लोकमन
May 31, 2024
in मनोरंजन
0
वीस वर्षानंतर सवंगडी एकत्र आले आणि रंगला स्नेहमेळावा ; उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते यांचीही उपस्थिती

टीम लोकमन मंगळवेढा |

वीस वर्षांपूर्वी आपण ज्या शाळेत शिकलो तसे ज्या बेंचवर बसून शिकलो त्याचा आनंद वीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी घेतला. पुन्हा एकदा शाळेत जाण्याचा तसेच दिवसभराचा आनंद अनुभवला इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील इयत्ता दहावीच्या 2004 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा वीस वर्षानंतर स्नेहमेळावा रंगला. इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील 2004 मध्ये दहावी मध्ये शिकलेल्या विद्यार्थी यांचा वीस वर्षांत झालेला बदल अनुभवण्यास उत्सुक होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रत्येक वर्गाची वेगवेगळ्या रांगा करून राष्ट्रगीत प्रार्थना व संविधान वाचन करून घेण्यात आली. यावेळी विद्यार्थी प्रार्थनेनंतर रांगेत वर्गात गेले. वर्गात गेल्यावर शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांनी स्वतःचे माहिती सांगून व सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणाची माहिती दिली व शिक्षकांनी देखील आपल्या वीस वर्षांपूर्वीच्या वर्गावरील अनुभव कथन केले. तसेच विद्यार्थि ही शाळेविषयी वर्गातील वीस वर्षांपूर्वी शिक्षकांविषयी व वर्ग मित्रांबद्दल अनुभव कथन केले व होत असलेल्या गाठीभेटीबद्दल व खाली खुशाली एकमेकांना शेअर केल्या तसेच नवनवीन गोष्टींना देखील उजाळा मिळाला. यावेळी कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष कदम प्रशालेचे तत्कालीन मुख्याध्यापक श्रीधर भोसले, गजेंद्र गडकर सर, एस एम पाटील सर, डांगे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी देशमाने सर, डीबी पाटील सर, काझी सर, केसी भोसले सर, हिरेमठ सर, माळी सर, मांडवे सर, आर पी पवार सर, मांडवे मॅडम, रेळेकर मॅडम, पाटील मॅडम, गोठणे सर, कुलकर्णी सर, गायकवाड सर, वाकळे सर, गोठणे सर, कदम मॅडम, काशीद सर हे शिक्षक उपस्थित होते. यावेळी शिक्षकांचा सत्कार शाल श्रीफळ तसेच भगवत गीता गुलाब पुष्प व एक भेटवस्तू देऊन करण्यात आला.

यावेळी मयत झालेल्या माजी शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अर्जुन आवतडे यांनी पोवाडा सादर केला तसेच उपजिल्हाधिकारी अभयसिह मोहिते यांनी प्रेमाचा जांगडगुत्ता यावर एक कविता ही सादर केली. अनेक विद्यार्थ्यांनी कराओके वर आपली कला सादर केली. यावेळी फनी गेम्स घेण्यात आली. यात संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात असे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला तसेच यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत फोटोसेशन करून सेल्फी पॉइंट वर फोटो काढण्यात सर्व विद्यार्थी मश्गूल होते. वीस वर्षानंतर एकमेकांना भेटल्याने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

अनेकांना आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना वीस वर्षांनी भेटल्याने आनंद ओसंडून वाहत होता. तसेच अनेकांनी ही भेट व या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणादायी ठरतील असे सांगितले. यावेळी विद्यार्थ्याबरोबर शिक्षकही भावुक झाले होते यापुढे आपणही असेच वेळ काढून घेत राहू असे एकमेकांना सांगून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमाची प्रस्तावना आयोजक अश्फाक मुजावर यांनी केले तसेच सूत्रसंचालन विश्वास मूढे व अर्चना चव्हाण यांनी केले तर आभार  विशाल राजमाने यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली.

Previous Post

सेवापूर्ती ! मंगळवेढ्याचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे 35 वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर आज सेवानिवृत्त होणार 

Next Post

वेळापूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) सोलापूरला स्थलांतरित करण्याच्या हालचाली ; जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शासनाला सादर केला प्रस्ताव

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group