टीम लोकमन मंगळवेढा |
इतर मागास व बहुजन कल्याण विभाग सोलापूर अंतर्गत पश्चिम विभाग वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धा पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेत माध्यमिक आश्रम प्रशाला, कला व विज्ञान महाविद्यालय बालाजीनगर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
14 वर्षे मुले
समर्थ रमेश राठोड -100 मी, 200 मी धावणे प्रथम क्रमांक, अजय पिंटू राठोड 400 मी धावणे प्रथम क्रमांक सचिन लायाप्पा पूजारी 400 मी धावणे द्वितीय क्रमांक.
14 वर्षे मुली
अक्षरा शिवाजी पवार -400 मी धावणे प्रथम क्रमांक, साक्षी रमेश राठोड -200 मी धावणे प्रथम. निशा कुमार पवार -100 मी प्रथम क्रमांक
17 वर्षे मुले
ज्ञानेश्वर धुमाळ-100 मी द्वितीय तसेच थाळीफेक प्रथम, भागनाथ रेवाप्पा ढाणे 400 मीटर तृतीय क्रमांक
17 वर्षे मुली
प्रणाली नानासो नरळे -400 मीटर द्वितीय, संजीवनी कुमार पवार -100 मीटर द्वितीय, प्रतिक्षा पुंडलिक राठोड -200 मीटर तृतीय क्रमांक
19 वर्षे मुले
अर्जुन प्रकाश पवार -100 मी प्रथम क्रमांक, सिद्धार्थ सागर उपासे -100 मी द्वितीय, प्रवीण पिंटू राठोड – 400 मीटर द्वितीय, प्रथमेश भीमाशंकर सलवदे 200 मीटर द्वितीय
19 वर्षे मुली
साक्षी सुरेश पाटील 400 मीटर धावणे द्वितीय, अश्विनी प्रकाश बिराजदार 400 मीटर धावणे तृतीय, सांघिक 4 बाय 100 रिले मध्ये 14 वर्षीय मुले व मुली प्रथम, 17 वर्षीय मुलींचा संघ व्दितीय क्रमांक, 19 वर्षीय मुलांचा संघ व्दितीय क्रमांक वरील सर्व खेळाडू या़ची जिल्हास्तरीय आश्रमिय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विजयी खेळाडूंचे प्राथमिक प्रशालेचे मुख्याध्यापक विलास पवार, माध्यमिक व उच्चमाध्यमिक प्रशालेचे प्राचार्य गणपती पवार, पर्यवेक्षक कुंडलिक पवार, शिक्षक सुखदेव घुले, श्रीकांत मेलगे यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्षा श्रीमती तुळसाबाई रजपूत, सचीव राहुलजी रजपूत, मार्गदर्शक उत्तमसिंह रजपूत, बालाजी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह रजपूत यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. वरील खेळाडूंना क्रीडाशिक्षक मनोहर शिंदे, अंबाण्णा म्हेत्रे, रामकृष्ण वराडे यांचे मार्गदर्शन लाभले.