टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई याच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजीएट परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून यामधे मंगळवेढा येथील नूतन मराठी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववी मधील ऋतुजा पांढरे व शिवानी माळी यांनी अ श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला असून त्यांनी यामध्ये उज्वल यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारच्या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक विद्यार्थी हा वक्तृत्व, नृत्य, गायन, वादन, चित्रकला, खेळ, स्नेहसंमेलन याशिवाय विविध वैकल्पिक कलेमध्ये सहभागी होतात. विद्यार्थ्यांच्या चित्रकलेला वाव देण्यासाठी विविध परीक्षा घेण्यात येतात. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई याच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजीएट परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामधे नूतन मराठी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववी मधील ऋतुजा पांढरे व शिवानी माळी यांनी अ श्रेणीत उत्तीर्ण होऊन उज्वल यश संपादन केले आहे.
इंटरमिजीएट या परीक्षेसाठी प्रशालेतील इयत्ता नववी व दहावी मधील एकूण 20 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. विश्वेश्वरी पवार, प्रज्ञा जुंदळे, सानिका सलगर, सानिका सावंजी, शिवाई इंगोले, श्रद्धा कोरे, वैष्णवी वाकडे यांनी ब श्रेणी मिळवली. तर आर्या जगताप, कल्याणी सावंत, प्रज्ञा माळी, समीना इनामदार, समृद्धी चंदनशिवे, समृद्धी जाधव, संस्कृती फटे, श्रेया भीमदे, श्रुष्टी बुरकुल, सुहाना शेख यांनी क श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे इयत्ता दहावी निकालात विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळणार आहेत.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशालेतील सहशिक्षक योगेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. एन. कुलकर्णी, उपाध्यक्षा निर्मला पटवर्धन, सचिव आप्पासाहेब महालकरी, मुख्याध्यापक गुरनिंग बंडगर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता औताडे, योगेश कुलकर्णी तसेच सर्व संचालक व संचालिका, बापूराव पांढरे, संतोष माळी, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.









