माडग्याळ : नेताजी खरात
शेगाव तालुका जत येथील ओम साई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने पहिली ते पाचवीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव येथील 19 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
ओम साई प्रतिष्ठान शेगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थी दत्तक योजना सुरू केली असून या योजनेमध्ये ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक मुलांना सर्व शालेय साहित्य व लागणारे इतर साहित्याचे देखील वाटप करण्यात आले.
यावेळी शेगावचे माजी सरपंच धोंडीराम माने, रवींद्र पाटील, ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान माने यांचेसह प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला डॉ. विश्वास बाबर, डॉ. प्रगती माने, सतीश माने, अविनाश बुरांडे, अनिता शिंदे मॅडम, सचिन जाधव, रावसाहेब शिंदे, शशिकांत कोडग, वर्षाराणी शिंदे, दीपक खुडे यांचे सहकार्य लाभले. यावेळी शेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख नरळे सर यांनी ओम साई प्रतिष्ठानचे कौतुक केले व शाळेच्या वतीने आभार मानले.








