news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

कौतुकास्पद ! महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या जीएनएम परीक्षेत मंगळवेढ्याच्या संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी मयुरी क्षीरसागर विशेष प्राविण्यासह प्रथम तर माधुरी पाच्छापूरे द्वितीय

टीम लोकमन by टीम लोकमन
December 21, 2024
in शैक्षणिक
0
कौतुकास्पद ! महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या जीएनएम परीक्षेत मंगळवेढ्याच्या संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी मयुरी क्षीरसागर विशेष प्राविण्यासह प्रथम तर माधुरी पाच्छापूरे द्वितीय

टीम लोकमन मंगळवेढा |

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल च्या वतीने 2024 रोजी घेण्यात आलेल्या जीएनएम परीक्षेत मंगळवेढ्याच्या मयुरी क्षीरसागर या विद्यार्थिनीने विशेष प्राविण्यसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या वतीने सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या जीएनएम द्वितीय वर्ष परीक्षेत मंगळवेढा येथील संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे कॉलेजच्या निकालाची व उज्वल यशाची परंपरा कायम राहिली असून कॉलेजच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे.

संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजमधील द्वितीय वर्षाच्या 50 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजचा निकाल 88 टक्के लागला असून कॉलेजमधील मयुरी क्षीरसागर व माधुरी पाच्छापूरे या दोन विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाल्या आहेत.

संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेज मंगळवेढा मध्ये प्रथम क्रमांक मयुरी क्षीरसागर, द्वितीय क्रमांक माधुरी पाच्छापूरे, तृतीय क्रमांक पल्लवी ठोंबरे व आकाश ढोबळे, चतुर्थ क्रमांक स्वाती लोखंडे, पाचवा क्रमांक धनश्री बनसोडे व वैशाली कांबळे

संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेज मंगळवेढा येथील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कॉलेजचे मार्गदर्शक डॉ. नंदकुमार शिंदे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. पुष्पांजली शिंदे, कॉलेजच्या प्राचार्या शरदिनी काळे, मार्गदर्शक शिक्षिका माधवी पवार- राजपूत, जगदीश सुतार, सोनाली बाबर व इतर विषय शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. पुष्पांजली शिंदे, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी अभिजीत बने, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. मनीष बसंतवाणी, अस्थिरोग तज्ञ डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, बालरोग तज्ञ डॉ. महेश कोनळळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रथमेश बाबर, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. मेघा महिंद्रकर, डॉ. रेणुका कोनळळी,

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, पॅथॉलॉजी विभाग प्रमुख दशरथ फरकंडे, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संतोष कोळसे पाटील, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार, संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या शरदिनी काळे, सौ. माधवी भूषण राजपूत-पवार, प्रवीण पवार, जनसंपर्क अधिकारी सोमनाथ हेगडे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मंगळवेढा सारख्या दुष्काळी व ग्रामीण भागात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची दारे खुली व्हावीत व ग्रामीण भागातील मुला मुलींना वैद्यकीय क्षेत्रात पदवीसोबतच चांगला रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने मंगळवेढ्यातील नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यांनी डॉ. नंदकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजची मुहूर्त रोवली. संपूर्ण मंगळवेढा तालुक्यासह राज्याच्या विविध भागातील अनेक गरीब विद्यार्थी या संकुलात वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

Previous Post

मोठी बातमी ! 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ; पोलीस दलात खळबळ

Next Post

हृदयद्रावक अपघात ! पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर व्होल्व्हो कार व कंटेनर ट्रकचा भीषण अपघात ; आयटी इंजिनियरसह एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत, मृत जत तालुक्यातील रहिवासी

Next Post
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

हृदयद्रावक अपघात ! पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर व्होल्व्हो कार व कंटेनर ट्रकचा भीषण अपघात ; आयटी इंजिनियरसह एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत, मृत जत तालुक्यातील रहिवासी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group