news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

कौतुकास्पद ! राज्यस्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी आश्रमशाळेचा प्रथम क्रमांक ; कर्णधार ऋतुराज वाघमारेची उत्कृष्ट कामगिरी, संघाचे सर्व खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पात्र

टीम लोकमन by टीम लोकमन
January 14, 2025
in क्रीडा
0
कौतुकास्पद ! राज्यस्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी आश्रमशाळेचा प्रथम क्रमांक ; कर्णधार ऋतुराज वाघमारेची उत्कृष्ट कामगिरी, संघाचे सर्व खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पात्र

टीम लोकमन टेंभुर्णी |

क्रीडा व युवक सेना संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुलात 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व केलेल्या टेंभुर्णी ता.माढा येथील जय तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा नाशिक विभागाचा पराभव करून राज्यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे.

टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा संघाने शालेय शूटिंग बॉल स्पर्धेच्या 19 वर्षाखालील गटामध्ये पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविला होता. आणि पुणे विभागाकडून खेळण्यासाठी यवतमाळ येथे राज्यस्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेतही अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागास पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावून फायनलमध्ये नाशिक विभागाबरोबर सामना झाला. सदर सामान्यामध्ये खेळून पहिला डाव 21-18 व दुसरा डाव 21-12 अशा चुरशीच्या लढ्यात संघाचा कर्णधार ऋतुराज रोहिदास वाघमारे यांने उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक विभागाचा पराभव करुन राज्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळविला व संघाचे सर्व खेळाडू पुणे विभागाकडून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यास पात्र ठरले. या विजेत्या संघास यवतमाळचे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांच्याहस्ते पुरस्कार व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.

या यशस्वी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक प्रा. संतोष शिंदे व रेणुकादास वाळके, महादेव चौगुले यांचे इतरमागास व बहुजन कल्याण विभाग सोलापूरच्या संचालिका मनीषा फुले, जिल्हा क्रीडा अधिकारी तानाजी मोरे, रेल्वे विभागाचे निरंजन मोरे, नांदेडचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, श्री. शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णीचे संस्थापक कैलास सातपुते, अध्यक्ष प्रशांत साळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी, प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका संतोषी आगावणे, प्रा. शुभम सातपुते तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Previous Post

मोठी बातमी ! वाल्मीक कराडला मकोका लागताच परळीत वातावरण तापले ; अचानक परळी बंदची हाक, बसवर दगडफेक, परळी शहरात तणावपूर्ण वातावरण

Next Post

धक्कादायक ! सांगोला तालुक्यातील तरुण इंजिनिअरची शिरवळमध्ये गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण आले समोर

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group