मंगळवेढा : प्रा. सागर पाटील
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी च्या माध्यमातून मंगळवेढा शहर, तालुका व परिसरातील विविध वंचित घटकांच्या उन्नती आणि उत्कर्षासाठी काम करणार असून मंगळवेढ्याच्या विकासामध्ये रोटरीचे योगदान महत्त्वपूर्ण असणार आहे असे मत रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी चे प्रेसिडेंट अमोल रत्नपारखी यांनी व्यक्त केले.
काही महिन्यांपूर्वीच रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी ची स्थापना आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून केली असून नोव्हेंबर २०२३ मध्ये रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकल यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा पदग्रहण समारंभ हॉटेल सुगरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रेसिडेंट अमोल रत्नपारखी व सेक्रेटरी अभिजीत बने यांच्या नेतृत्वाखाली व आमच्या रोटरीतील सहकाऱ्यांच्या समन्वयातून रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी ची दमदार वाटचाल चालू आहे.अल्पावधीतच रोटरीच्या माध्यमातून मंगळवेढा शहर व तालुक्यामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले असून यापुढेही ही मालिका निरंतर चालूच राहणार आहे.
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यामध्ये दीडशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्त तपासणी, इसीजी, ब्लड प्रेशर, एक्स-रे व कन्सल्टेशन मोफत करण्यात आले शिवाय या शिबिरामधील रुग्णांना औषधे सुद्धा मोफत देण्यात आली. याच शिबिरामध्ये एका रुग्णावरती मोफत एन्जीओप्लास्टी करण्यात आली. या शिबिरासाठी रोटरी क्लबचे सदस्य व फिजिशियन डॉ.मनीष बसंतवाणी, डॉ.अरुणकुमार महिंद्रकर, डॉ.समाधान टकले यांनी विशेष योगदान दिले.

मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहामध्ये दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडन्स शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये दहावी व बारावीतील सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. दहापेक्षा अधिक इंजीनियरिंग, फार्मसी, नर्सिंग, मेडिकल कॉलेज व विविध महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. सोलापूर विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक प्रा.डॉ. दादासाहेब साळुंखे यांचेसह विविध विषयातील तज्ञ मान्यवरांनी विद्यार्थ्यांना करिअर बद्दल मार्गदर्शन केले. तालुक्यातील विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी तालुक्यातील ११ शाळांना ग्रंथालयासाठी कपाट व पुस्तके रोटरीच्या वतीने मोफत देण्यात आली. हे तीन महत्त्वपूर्ण उपक्रम आत्तापर्यंत राबविले असून यापुढेही असे अनेक उपक्रम करण्याचा मानस असल्याचेही रत्नपारखी यांनी सांगितले.
रोटरी ३१३२ च्या प्रांतपाल स्वाती हेरकल, सहाय्यक प्रांतपाल अतुल चव्हाण, माजी सहाय्यक प्रांतपाल जयेशभाई पटेल, २०२४-२५ च्या सहाय्यक प्रांतपाल पुनम देवदास, रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे प्रेसिडेंट माऊली झांबरे, क्लब ॲडव्हायझर प्रा. सचिन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सीटी चे प्रेसिडेंट अमोल रत्नपारखी व सेक्रेटरी अभिजीत बने यांच्या नेतृत्वात रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी ची दमदार वाटचाल सुरू असून उद्योजक सागर शहा, डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, प्राचार्य सुधीर पवार, मेजर चंगेजखान इनामदार, डॉ. दशरथ फरकंडे, उद्योजक इंजिनीयर चेतन गाढवे, मेजर मल्लय्या स्वामी, उद्योजक दिलीप घाडगे, डॉ. मनीष बसंतवाणी, उद्योजक जनार्दन शिवशरण, उद्योजक असिफ शेख, उद्योजक उमेश मर्दा, डॉ. दत्तात्रय घोडके, डॉ. समाधान टकले, पत्रकार ॲड. डॉ. समीर इनामदार या संचालकांसह प्राध्यापक श्रीगणेश गायकवाड, उद्योजक धनाजी जाधव, डॉ. निनाद नागणे, प्रगतशील शेतकरी सुशील पाटील, प्राध्यापक सागर पाटील, उद्योजक दत्ता भुसे, उद्योजक भरतसिंह राजपुरोहित, उद्योजक गंगाराम खांडेकर, इंजिनिअर श्याम चव्हाण, उद्योजक सुहास ताड, उद्योजक आनंद खटावकर, डॉ. सचिन बनसोडे, उद्योजक गजानन शिंदे, मेजर भारत शिंदे या सहकाऱ्यांच्या सोबतीने मंगळवेढा तालुक्यात रोटरीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याचेही रत्नपारखी यांनी सांगितले.









