टीम लोकमन मंगळवेढा |
नुकत्याच सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे झालेल्या अबॅकस रिजनल स्पर्धेमध्ये मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
या स्पर्धेमध्ये सोलापूर, लातूर, धाराशिव व सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मंगळवेढा येथील विद्यार्थिनी कुमारी ईशान्वि अजितसिंह पवार, हिबजा हरूर आतार, तनिष्का दामाजी वाले, श्रेया हनुमंत बिरादार, साक्षी राजू जाधव, पियुष भागवत पाटील या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळाला तर दिव्या लंगोटे विराज शेंबडे, आशिष जाधव, श्रेयस मेडीदार यांनी द्वितीय क्रमांक मिळविले आहेत. यशराज हुशार, दिव्यांश्या उबाळे, प्रणिती शेवाळे, प्रज्ञा शेवाळे, राणाशाल भारते, स्वरा शिंदे प्रांजली कराळे यांनी तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविले आहेत.
गोल्ड मेडलिस्ट मध्ये स्वरगंधा पवार, शिवतेज आतकरे, अखिलेश जाहारगीरदार, अहमद मुलाणी, अहिल मुजावर, गौरी नागणे, शिवन्या तानगावडे, आराध्या लोंढे, सलोनी माने, ज्योती बेनकर, श्रीषा धायगोंडे, संस्कार निगडी शिवानी शेवाळे, वैष्णव काटेकर, श्री चव्हाण, श्रेयस माळी, अद्वैत बनसोडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. पुष्पांजली शिंदे, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, फिजिशियन डॉ. मनीष बसंतवाणी, अस्थिरोग तज्ञ डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, बालरोग तज्ञ डॉ. महेश कोनळळी, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संतोष कोळसे पाटील, संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या शरदिनी काळे, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार यांनी अभिनंदन केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सौ. प्राजक्ता भगरे यांचे मार्गदर्शन लाभले.








