टीम लोकमन सोलापूर |
स्पेन्का मिनरल वॉटरच्या नव्या तंत्रज्ञानाच्या अल्कलाइन आयोनायझरचे अनावरण व स्पेन्का कंपनीच्या सात रस्ता परिसरातील नवीन सुसज्ज कार्पोरेट कार्यालयाचा शुभारंभ साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचेहस्ते आज रविवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे संपन्न होणार असल्याची माहिती स्पेन्का मिनरल वॉटरचे व्यवस्थापकीय संचालक सुहास आदमाने व अश्विनी आदमाने यांनी दिली.
सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे होत असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रिसिजन कॅम्पशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा स्वीकारणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) गावामध्ये सुहास आदमाने यांनी 2015 साली स्पेन्का कंपनीची स्थापना केली. दहा वर्षांपूर्वी मिनरल वॉटरच्या उत्पादनापासून सुरु झालेला हा प्रवास आज फ्लेवर मिल्क, सॉफ्ट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक, अल्कलाईन वॉटर, चहा अशा गुणवत्तापूर्ण उत्पादनांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा येथील पाच हजाराहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या माध्यमातून लाखो नागरिकापर्यंत स्पेन्का मिनरल वॉटर हा ब्रँड पोहचला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथेही स्पेन्काच्या माध्यमातून आत्ताधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा मिनरल वॉटर उत्पादनांचा प्लांट उभारण्यात आला आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये लाखो भाविकांना व वारकऱ्यांना मिनरल युक्त पाणीपुरवठा स्पेन्काच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून सेवाभावी वृत्तीने अविरतपणे केला जात आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन, आपुलकीची सेवा, उत्तम व्यवस्थापन यामुळे स्पेन्का हा भारतातील एक नामांकित ब्रँड म्हणून ओळखला जात आहे. अल्प कालावधीत संपूर्ण देशवासीयांच्या पसंतीस उतरलेला मिनरल वॉटरचा ब्रँड म्हणून स्पेन्काने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भविष्यामध्ये अनेक उत्तम व आरोग्यदायी उत्पादन देण्याच्या हेतूने स्पेन्का अल्कलाइन आयोनायझर ग्राहकासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आयोजनायझरचे अनावरण 11 मे रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही सुहास आदमाने यांनी सांगितले.







