news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

काळाचा घाला ! उजनीतील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडले ; नातेवाईकांचा आक्रोश, एकाचा शोध अद्यापही सुरूच

टीम लोकमन by टीम लोकमन
May 23, 2024
in ब्रेकिंग न्यूज
0
काळाचा घाला ! उजनीतील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडले ; नातेवाईकांचा आक्रोश, एकाचा शोध अद्यापही सुरूच

टीम लोकमन मंगळवेढा |

उजनी धरणाच्या पाण्यातील भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्याने उलटलेल्या बोटीतील बेपत्ता झालेल्या व्यक्तींपैकी पाचजणांचे आज गुरुवारी सकाळी शोध कार्य सुरु केल्यानंतर मृतदेह सापडले आहेत. पाण्यात तरंगताना त्यांचे मृतदेह दिसले. त्यानंतर संपुर्ण परिसरात एकच आक्रोश सुरु झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील आणखी एक व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे. बोट उलटलेच्या ठिकाणापासून काही अंतरावर हे मृतदेह सापडले आहेत.

कुगाव येथील अनुराध ज्ञानदेव अवघडे (वय २८ बोट चालक), गौरव धनंजय डोंगरे (वय २४), झरे येथील गोकुळ जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३) व शुभम गोकुळ जाधव (दिड वर्ष) हे बेपत्ता झाले होते. त्यातील पाचजणांचे मृतदेह सापडले आहेत. सोलापूर जिल्ह्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या उजनी धरण परिसरात मंगळवार दिनांक २१ मे रोजी सायंकाळी मन हेलावून टाकणारी अतिशय धक्कादायक घटना घडली होती. करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळशी दरम्यान वादळी वाऱ्यात एक प्रवासी बोट उलटली होती. या बोटीमधून सात प्रवासी प्रवास करत होते. त्यातील एकजण पोहत बाहेर आल्याने बचावला होता. मात्र सहाजणांचा तपास सुरु होता. आज सकाळी त्यातील पाच मृतदेह मृतदेह सापडले आहेत.

एनडीआरएफचे पथक व खासगी बोटीच्या साह्याने त्यांचे शोधकार्य सुरु होते. घटनेचे वृत्त समजल्यापासून बेपत्ता व्यक्तींचे शोधकार्य सुरु होते. मंगळवारी रात्री अंधारात तपास कार्यात अढथळा आला होता. बुधवारी सकाळी साडेसात वाजता शोध कार्य सुरु झाले. करमाळा हद्दीतील बाजूला कुगावसह परिसरातील नागरिकांकडून शोध घेतला जात होता तर कळशीच्या बाजूनेही शोध मोहीम सुरुच होती. 1 पाणबुडी, 3 बोटी व 20 जवान हे या शोधमोहिमेत सहभागी झाले होते. त्यांच्या मदतीसाठी परिसरातील मच्छिमार व प्रवासी बोटीही सहभागी होऊन मदत कार्य करीत होत्या.

Previous Post

कशी काळाची चाहूल आली… ! काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला ; कोल्हापूरमधील करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे निधन

Next Post

गुड न्यूज ! राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा ‘हॅपी सॅटर्डे’ ; राज्य शासन शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवणार नवीन उपक्रम

Next Post
गुड न्यूज ! राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा ‘हॅपी सॅटर्डे’ ; राज्य शासन शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवणार नवीन उपक्रम

गुड न्यूज ! राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा 'हॅपी सॅटर्डे' ; राज्य शासन शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवणार नवीन उपक्रम

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group